कला आणि संगीतासाठी एमजी मोटर इंडिया तर्फे नैना हा विशेष उपक्रम

41

पुणे, : एमजी मोटर इंडियाने कला आणि संगीत क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना एकत्र आणण्यासाठी संगीतक्षेत्रातील ऑनलाइन प्लॅटफॉर्म, सॉन्गड्यूच्या सहकार्याने नैना हा विशेष उपक्रम दाखल केला आहे. हा उपक्रम या क्षेत्रातील सर्जनशील अभिव्यक्तीला नवी परिभाषा देऊ करतो. संगीत प्रेमींना आकर्षित करण्याची क्षमता यात आहे.नैनामध्ये नवाझीशीन या उत्कृष्ट बँडने रचलेली एक संगीत रचना आहे. त्यासोबत जागतिक ख्यातीचे चित्रकार विजेंदर शर्मा यांनी तयार केलेली आकर्षक चित्रकृती आहे. हे दोघे एकत्रितपणे प्रेक्षकांसमोर एक कथा साकारतात, ज्यामध्ये आपण जीवनात घातलेले मुखवटे आणि प्रत्यक्षात असणारा विरोधाभास यांचा अनुभव देतात. ही कलाकृती प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते.

“नैना” हा फक्त एक म्युझिक व्हिडिओ नाही, तर तो जगभरातील संगीत प्रेमींना एक विलक्षण अनुभव देणारा अनोखा उपक्रम आहे. जो दोन कलाप्रकारांना एकत्रित आणतो. प्रतिभावान बँड नवाजीशीनने संगीतबद्ध केलेली संगीतरचना लोक कसे वेगवेगळे मुखवटे घालतात आणि त्यामुळे त्यांना आनंददायी आणि अप्रिय असे विविध अनुभव येतात त्याचा अनुभव देते. मनाला भिडणारे संगीत आणि हृदयस्पर्शी गीत श्रोत्यांना आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षणाच्या मार्मिक प्रवासात घेऊन जाते.

एमजी ताल उपक्रमाद्वारे दोन सर्वोत्तम उदयोन्मुख संगीत प्रतिभा म्हणून निवडल्या गेलेल्या नवाझीशीन यांनी “नैना” मध्ये त्यांचे सर्वोत्तम संगीत सादर केले आहे. भारतीय कलाकारांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे प्रतिभावान नवाजीशीनला पुढे आणण्यात आले आहे. नैना हा उपक्रम संगीतक्षेत्रातील असामान्य प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या एमजी मोटर इंडियाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

आपल्या आकर्षक आणि वास्तववादी कलाकृतींसाठी ओळखले जाणारे प्रख्यात चित्रकार विजेंदर शर्मा यांनी नैनामध्ये सहभाग घेत, आपल्या विलक्षण प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. त्यांनी यातील संगीत रचनेच्या संकल्पनेपासून प्रेरित होऊन, शर्मा यांनी “नैना” मागील भावना आणि सार यांचा अर्थ लावत, त्यांच्या अतुलनीय शैलीत एक पेंटिंग तयार केले आहे. त्यांचा विस्तृत अनुभव आणि कलेबद्दलच्या सखोल जाणिवेतून साकारलेल्या कलाकृतीने या उपक्रमाला सखोलता आणि अर्थपूर्णता आली आहे. या उपक्रमाला नवीन कलात्मक उंचीवर नेले आहे. शर्मा यांनी या उपक्रमाबद्दल आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “सर्जनशीलता आणि नावीन्य मला माझ्या सीमा ओलांडण्यासाठी नेहमीच उत्तेजित करते. मला ‘नैना’ या संगीत रचनेमागील विचार आणि मांडणी मली आवडली. त्यानुसार, मी तयार केलेल्या पेंटिंगमधून तेच विचार प्रेक्षकांना दिसतील, अशी मला खात्री आहे. ”

“नैना” आता सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, ज्यात लिस्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचाही समावेश आहे. हा म्युझिक व्हिडिओ सॉन्गड्यू टीव्हीवर तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.