कलर्स आगामी काल्‍पनिक मालिका ‘दुर्गा और चारू’मध्‍ये घेऊन येत आहे दोन बहिणींची हृदयस्‍पर्शी कथा

82

पुणे, ९ डिसेंबर २०२२ : सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका ‘बॅरिस्‍टर बाबू’मधील स्‍वर्गीय बोंदिता व अनिरूद्ध रॉय चौधरी यांचा वारसा कलर्सवरील मालिका ‘दुर्गा और चारू’मध्‍ये त्‍यांच्‍या मुली पुढे घेऊन जाणार आहेत. चारूमध्‍ये तिच्‍या आईचे रूप दिसून येतेतर दुर्गा तिची सावली आहे. ही नवीन मालिका दोन बहिणींच्‍या प्रवासाला सादर करते, ज्‍या रक्‍ताच्‍या नात्‍याने बांधलेल्या असल्‍या तरी लहानपणी वेगळ्या झाल्‍यामुळे त्‍यांचे संगोपन वेगळे झाले आहे, ज्‍यामुळे त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व एकमेकींच्‍या अगदी विरूद्ध आहे. शशी सुमीत प्रॉडक्‍शन्‍स निर्मित मालिका १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होईल. चॅनेलने दुर्गा व चारूची प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी अनुक्रमे लोकप्रिय कलाकार औरा भटनागर व वैष्‍णवी प्रजापती यांची निवड केली आहे. बोंदिता व अनिरूद्धच्‍या मुलींसाठी नशीबाने काय लिहिलेले आहे? त्‍यांचे मिलन होईल का?

व्‍हायकॉम१८ च्‍या हिंदी मास एंटरटेन्‍मेंटच्‍या चीफ कन्‍टेन्ट ऑफिसर मनिषा शर्मा म्‍हणाल्‍या, “कलर्समध्‍ये आमचे नेहमीच प्रेक्षकांशी संलग्‍न होणाऱ्या कथा सादर करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. अशीच एक कथा मालिका ‘बॅरिस्‍टर बाबू’ची आहे. ही मालिका अत्‍यंत यशस्‍वी ठरण्‍यासोबत प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. हाच वारसा पुढे नेत आमची नवीन काल्‍पनिक मालिका ‘दुर्गा और चारू’बोंदिता व अनिरूद्धच्‍या मुलींच्‍या हृदयस्‍पर्शी प्रवासाला सादर करते, ज्‍या दोन भिन्‍न वातावरणांमध्‍ये मोठ्या झाल्‍यामुळे त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व एकमेकींच्‍या विरूद्ध आहे. आम्‍ही नवीन चॅप्‍टर सुरू करण्‍यासोबत लोकप्रिय मालिकेला पुढे घेऊन जात असताना आम्‍हाला मालिका ‘दुर्गा और चारू’साठी तेच प्रेम व कौतुक मिळण्‍याची आशा आहे.’’

स्‍वातंत्र्यपूर्वीच्या व नंतरच्‍या काळात स्थित मालिका ‘दुर्गा और चारू’नम्र व साधीमुलगी दुर्गा (औरा भटनागर) आणि तिची स्‍ट्रीट-स्‍मार्ट थोरली बहीण चारू (वैष्‍णवी प्रजापती) यांच्‍या कथेला सादर करते. दोन्‍ही बहिणींना एकमेकींच्‍या अस्तित्‍वाबाबत माहित नाही. दोघींचे संगोपन वेगळे झाले असल्‍यामुळे त्‍या एकमेकींपेक्षा वेगळ्या आहेत. दुर्गामितभाषी, दृढआणिशिक्षणातहुशारआहे, तरतिचीबहीणचारूहीरागीट, स्पष्टवक्तीआणिकलाबाजीकरूनआपलाउदरनिर्वाहकरते. दुर्गालाश्रीमंतपालकांनीदत्तकघेतलेआहेआणिचारूलाकॉनकलाकारांनीवाढवलेआहे. कितीदिवसदोघीएकमेकींबद्दलअनभिज्ञराहणार?

निर्माते शशी मित्तल म्‍हणाले, “’दुर्गा और चारू’ब्रिटीश वसाहतीच्‍या काळात स्थित कालातीत मालिका आहे, जी दोन बहिणींच्या ‍या प्रवासाला दाखवते. या दोघींनी आपल्‍या आईवडिलांना गमावलेअसून त्‍या लहानपणीच एकमेकींपासून वेगळ्या होतात. पण शेवटी नियतीच त्‍यांना एकत्र आणते आणि विविध भावनिक प्रतिकूल स्थितींमध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍याची परीक्षा घेतली जाते. आमच्‍या मालिकांसह आमचा सामाजिक विचारसरणीवर प्रभाव टाकणाऱ्या विविधबाबींशी सामना करण्‍याचा मनसुबा आहे. कलर्ससोबतचा आमचा सहयोग लाभदायी राहिला आहे. आम्‍हाला सर्जनशील स्‍वातंत्र्यासह सर्वोत्तम टीमसोबत काम करण्‍याची संधी मिळाली आहे आणि आम्‍ही मालिका ‘दुर्गा और चारू’सह आम्‍ही प्रेक्षकांसाठी आणखी एक लक्षवेधक कथा सादर करण्‍याची आशा करतो.’’

दुर्गाची भूमिका साकारण्‍यासाठी उत्‍साहित असलेली औरा भटनागर म्‍हणाली, “लहान बोंदिता म्‍हणून मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळाला आहे. आता मी नवीन भूमिका दुर्गा साकारण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ती तिच्‍या आईचे प्रतिबिंब आहे, जी शिक्षणामध्‍ये हुशार आहे, पण तिच्‍या संगोपनामुळे समाजाप्रती अनोखी आहे. मालिका ‘बॅरिस्‍टर बाबू’व कलर्ससेाबत पदार्पण केल्‍यानंतर मला पुन्‍हा एकदा नवीन चॅप्‍टरसाठी चॅनेलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.’’

चारूची भूमिका साकारण्‍यासाठी सज्‍ज असलेली वैष्‍णवी प्रजापती म्‍हणाली, “चारूची शीर्षक भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी संधी आहे आणि मी ही संधी देण्‍याकरिता मालिका ‘दुर्गा और चारू’ची संपूर्ण टीम व कलर्सचे आभार मानते. मला चारूबाबत आवडलेली बाब म्‍हणजे ती तिची आई बोंदिताप्रमाणे उत्‍साही व नीडर आहे. मला विश्‍वास आहे की चारू उत्‍साही मुलगी म्‍हणून प्रेक्षकांची मने जिंकेल, कारण तिला स्‍वत:च्‍या जीवनावर नियंत्रण कसे ठेवावे हे माहित आहे.’’

पहा दोन बहिणींची हृदयस्‍पर्शी कथा दुर्गा और चारू१२ डिसेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त कलर्सवर