कलर्स अंकित गुप्‍ता, गौतम सिंग विग व नेहा राणा अभिनीत आगामी काल्‍पनिक मालिका ‘जुनूनियत’सह घेऊन येत आहे संगीत व प्रेमाची जादू

90

४ जानेवारी २०२३ : असे म्‍हणतात की, संगीत मानवजातीची वैश्विक भाषा आहे. संगीतामधील जादू शब्‍दांमध्‍ये व्‍यक्‍त करता येऊ शकत नाही. संगीत व प्रेमाच्‍या अस्‍सल क्षमतेला सादर करत कलर्सवरील आगामी काल्‍पनिक मालिका ‘जुनूनियत’ तीन महत्त्वाकांक्षी व उत्‍कट गायकांच्‍या प्रवासाला सादर करते. पंजाबच्‍या पार्श्‍वभूमीवर स्थित या मालिकेमध्‍ये अंकित गुप्‍ता, गौतम सिंग विग व नेहा राणा हे अनुक्रमे जहान, जॉर्डन व ईलाही या प्रमुख भूमिकांमध्‍ये आहेत. सरगुन मेहता व रवी दुबे यांच्‍या ड्रीमीयता एंटरटेन्‍मेंटद्वारे निर्मित ही मालिका पंजाबमधील संगीताचे सखोल संबंध आणि राज्‍यामध्‍ये असलेल्‍या प्रतिभावान व्‍यक्‍तींच्‍या समूहाला दाखवते. ‘जुनूनियत’ ही ईलाही, जहान व जॉर्डनची कथा आहे, जे त्‍याच्‍या संगीतशैलीप्रमाणे एकमेकांपेक्षा विभिन्‍न आहेत आणि ते एकमेकांना भेटतात तेव्‍हा त्‍यांच्‍या कलेमध्‍ये माहीर होण्‍याच्‍या स्‍वप्‍नांना घटनापूर्ण वळण मिळते. संगीत त्‍यांच्‍यामधील तूट व दुरावा दूर करेल का? त्‍यांची स्‍वप्‍ने तुटतील तेव्‍हा काय घडेल?

जहानची भूमिका साकारण्‍याबाबत अंकित गुप्‍ता म्‍हणाले, ‘‘‘बिग बॉस १६’च्‍या घरामध्‍ये ८० दिवस राहिल्‍यानंतर संगीताच्‍या आवडीवर आधारित नवीन उत्‍साहवर्धक काल्‍पनिक मालिका ‘जुनूनियत’मध्‍ये ही भूमिका मिळाल्‍याने खूप आनंद झाला आहे. अगदी घरासारखे वाटणारे चॅनेल कलर्ससोबत ही माझी तिसरी मालिका आहे आणि ‘उडारियाँ’नंतर सरगुन मेहता व रवी दुबे यांच्‍यासोबत दुस-यांदा काम करत आहे. मालिका ‘उडारियाँ’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि एक कलाकार म्‍हणून माझ्या करिअरला मोठी कलाटणी दिली. प्रेक्षकांनी माझ्या करिअरदरम्‍यान भरपूर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि मी आशा करतो की, या मालिकेसह देखील प्रेमाचा हा वर्षाव सुरूच राहिल.’’ 

जॉर्डनची भूमिका साकारण्‍याबाबत उत्‍साहित गौतम सिंग विग म्‍हणाले, ‘‘मला माझ्या मनाच्‍या खूप जवळ असलेल्‍या थीम्‍सवर आधारित मालिका ‘जुनूनियत’मध्‍ये जॉर्डनची भूमिका साकारण्‍यास मिळाल्‍यामुळे आनंद होत आहे. या मालिकेमधील संगीत विश्‍व अद्भुत आहे आणि मालिकेचे कथानक तीन संगीत महत्त्वाकांक्षींच्‍या प्रेममय प्रवासाला सादर करते. अनेक गाण्‍यांचे आपल्‍या सर्वांसाठी नॉस्‍टेल्जिक महत्त्व आहे आणि ही मालिका प्रेम व संगीताच्‍या आपल्‍या आठवणींना जागवते. म्‍हणून ही मालिका माझ्यासाठी खास आहे. कलर्स भारतीय प्रेक्षकांसाठी रोमांचक कथानक सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याच्‍या चॅनेलच्‍या प्रयत्‍नांबाबत कोणतीच शंका नाही. मला ‘बिग बॉस १६’मधील स्टीण्‍टनंतर या मालिकेच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याचा आनंद होत आहे.’’

मालिकेमधील आपली भूमिका ईलाहीबाबत सांगताना नेहा राणा म्‍हणाली, ‘‘मला संगीतावर आधारित अशा विशेष कथानकसह कलर्स कुटुंबाचा भाग असल्‍याने खूप आनंद झाला आहे. निश्चितच संगीताने माझ्या जीवनात मोठी भूमिका बजावली आहे आणि आता मी संगीताच्‍या अवतीभोवती असलेल्‍या संकल्‍पनेवर आधारित मालिकेचा भाग आहे. माझी भूमिका ईलाही तरूण गायिका आहे, जी मनाने घायाळ असली तरी दयाळू आहे. प्रेक्षकांकडून या भूमिकेला मिळणारी प्रतिक्रिया जाणून घेण्‍यास मी अत्‍यंत उत्‍सुक आहे.’’

अधिक अपडेट्ससाठी पाहत पहा कलर्स!