कलर्सवरील ‘सुहागन’ या लोकप्रिय मालिकेतील बिंदियाच्या वेधक कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. बिंदिया आपल्या मोठ्या कुटुंबातील सगळी कामे करत असते, पण तिचे कुटुंबीय मात्र तिला आणि तिची बहीण पायल हिला चांगली वागणूक देत नाहीत. या दोघी बहीणींच्या गोष्टीत आता 10 वर्षांची लीप येत आहे, ज्याच्यामुळे या व्यक्तिरेखांच्या जीवनात बदलाची जणू वावटळ आलेली दिसेल. या लीपनंतर 23-वर्षीय बिंदियाच्या भूमिकेत दिसेल गरिमा किशनानी तर 21 वर्षीय पायलची भूमिका करत आहे, सुंदर अभिनेत्री अंशुला धवन.
कथानकात एक नवीन व्यक्तिरेखा दाखल होत आहे- कृष्णा, जी साकारली आहे अभिनेता राघव ठाकूर याने. कृष्णा एक 23 वर्षांचा, श्रीमंत घरातला, काहीसा बिघडलेला मुलगा आहे, ज्याला कोणतीही जबाबदारी न घेता ऐशोआरामात आयुष्य जगायचे आहे. लीपनंतर बिंदिया एक अॅग्रिकल्चरिस्ट म्हणून मेहनत करत आहे, तर पायल लखनौ येथे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहे. बिंदियाच्या विपरीत, पायलला आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीची शरम वाटते. कृष्णाशी ती रिलेशनशिप मध्ये आहे, जे तिने सर्वांपासून लपवून ठेवले आहे. जेव्हा काही परिस्थिती उभी राहिल्याने बिंदिया कृष्णाशी लग्न करते, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील गुंतागुंत वाढते. बिंदियाचे भागधेय आणि पायलचे प्रेम जीवन एकमेकांत गुंततात आणि त्यांचे भविष्य अनिश्चित होते, तेव्हा पायल कृष्णाची कायदेशीर पत्नी होण्यासाठी खोट्या खोट्या गोष्टींचे एक जाळे विणते. आपल्या बहिणीने रचलेल्या कारस्थानास बळी न पडता बिंदिया कृष्णाची ‘सुहागन’ म्हणून आपला अधिकार टिकवून ठेवू शकेल का?
बिंदियाची भूमिका करत असलेली गरिमा किशनानी म्हणते, “कलर्सच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करताना मला खूप अभिमान आणि उत्साह वाटतो आहे. मी या मालिकेत बिंदियाची भूमिका करत आहे, जी एकटी आपल्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी सांभाळत असते.तिच्या कनवाळू आणि सकारात्मकस्वभावामुळे ती सगळ्यांची लाडकी बनली आहे. मला बिंदिया बरीचशी माझ्यासारखी वाटते. कारण ती तिच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः आपल्या बहिणीसाठी जे करत आहे, तेच मी माझ्या कुटुंबासाठी केले असते.मला आशा आहे की, या मालिकेला यापुढे देखील असेच प्रेम मिळत राहील आणि लोक मला बिंदियाच्या भूमिकेत स्वीकारतील.
पायलची भूमिका करणारी अंशुला धवन म्हणते, “सुहागन मालिकेला प्रेक्षकांचे उंदड प्रेम मिळाले आहे आणि या मालिकेत पायलच्या भूमिकेत दाखल होताना मला खूप आनंद होत आहे. एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधणाऱ्या मुलीच्या भूमिकेत माझ्यातील अभिनय कलेचा शोध घेताना मी रोमांचित झाले आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता असेल आणि ते आमच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतील.”
कृष्णाची भूमिका करणारा राघव ठाकूर म्हणतो, “निमा डेंझोंग्पा या मालिकेनंतर पुन्हा एकदा कलर्सबरोबर काम करताना मला खूप आनंद होत आहे. मी कृष्णाची भूमिका करत आहे, ज्याला आपल्या कुटुंबाचा व्यवसाय चालवण्याची जबाबदारी नको आहे. आपले मित्र आणि प्रेयसी पायल यांच्यासोबत मस्ती आणि ऐश करण्यातच फक्त त्याला रस आहे. परिस्थितीच्या दबावामुळे त्याला पायलची बहीण बिंदिया हिच्याशी लग्न करावे लागते. त्याच्या या निर्णयामुळे त्या तिघांचे जीवन प्रभावित होते. कथानकातील लीपनंतर प्रेक्षकांना माझी व्यक्तिरेखा आणि माझा अभिनय कसा वाटतो आहे, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.”
सुहागन मालिकेत 10 वर्षांच्या लीपनंतर बिंदियाचा पुढचा प्रवास बघा, दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त कलर्सवर!