कलर्सवरील मालिका ‘सावी की सवारी’मध्ये सावीच्या जीवनात अडथळे संपत नाही असे वाटते. मालिकेने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच एपिसोड्समध्ये पाहायला मिळाले की, सावी तिच्या घटस्फोटाचा सामना करत आहे आणि तिच्या आईच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटोरिक्षा चालवण्यास परत आली आहे. सध्याच्या कथानकामध्ये सावी (समृद्धी शुक्लाने साकारलेली भूमिका) आणि नित्यम (फरमान हैदर) हे घटस्फोट पेपरवर स्वाक्षरी केल्यानंतर समेटसाठी सहा महिन्यांच्या कूलिंग पीरियडवर आहेत आणि त्यांनी स्वत:ला त्यांच्या कामामध्ये गुंतवले आहे. प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधून घेण्यासाठी या रोमँटिक मालिकेमध्ये अनिता राज यांचे स्वागत होणार आहे, जेथे त्या मालिकेमध्ये नित्यमची दादी बुआ कुमुद अग्रवालच्या भूमिकेत प्रवेश करणार आहेत. यूएसएमधून भारतात परतलेली कुमुद अत्यंत शिस्तबद्ध आहे, जिचा परंपरांवर विश्वास आहे आणि कौटुंबिक मूल्यांचे पालन करण्याबाबत ती अत्यंत कठोर आहे.

ती दालमिया कुटुंबामध्ये कोणते नवीन ट्विस्ट्स घेऊन येते हे पाहणे रोचक असणार आहे.
मालिकेमध्ये सामील होण्याबाबत अनिता राज म्हणाल्या, ‘‘मालिका ‘सावी की सवारी’ला हृदयस्पर्शी कथानकासह प्रेक्षकांचे मन जिंकताना पाहून खूप आनंद होत आहे. मी नित्यमची दादी बुआ कुमुद अग्रवालच्या भूमिकेत या मालिकेचा भाग होण्यास उत्सुक आहे. माझी भूमिका कुटुंबाच्या वागण्याच्या पद्धतीबाबत अत्यंत शिस्तबद्ध आहे आणि अमेरिकेमध्ये स्थायिक असली तरी ती भारतीय परंपरांशी सखोलपणे जुडलेली आहे. भारतात तिचे येणे मालिकेच्या कथानकाला नवीन वळण देते. मी या मालिकेमधील सर्व प्रतिभावान कलाकारांमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे. आशा करते की, प्रेक्षक माझ्या प्रवेशाला स्वीकारतील.’’
पाहत राहा ‘सावी की सवारी’ दर सोमवार ते रविवार सायंकाळी ६.३० वाजता फक्त कलर्सवर.