कलर्सवरील बिग बॉसचा नवीन सीझन म्हणजे ‘दिल, दिमाग आणि दम’

16

मनोरंजनाची वैभवशाली परंपरा निर्माण करणारा आणि 16 वर्षांपासून चाहत्यांमध्ये गाजत असलेला कलर्सवरील बिग बॉस हा शो आपल्या देशातील अत्यंत लाडका रियालिटी शो आहे. हा शो लवकरच तुमच्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर येत आहे. या शोच्या आगामी सीझनचा एक दमदार फर्स्ट लुक रिलीज झाला आहे आणि त्यात नवीन बाजी पालटणारा मंत्र – दिल, दिमाग आणि दम यांची जाहिरात करण्यात आली आहे. या खेळात गेल्या वर्षीपेक्षाही अधिक रोमांचक वळण येणार आहे. कारण यावेळी एक रोचक ट्विस्ट हा आहे की, ‘इस बार गेम नहीं होगा सबके लिए सेम टू सेम’. त्यामुळे, यावेळी मागच्या सर्व सीझन्सपेक्षा आगळावेगळा सीझन आपल्याला बघायला मिळणार आहे.

या सीझनच्या थीमविषयी बोलताना होस्ट सलमान खान म्हणाला, “यावेळेस बिग बॉस ‘दिल, दिमाग आणि दम’ चा खेळ आहे आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी तो एकसारखा असणार नाही. यावेळी हा खेळ वेगळ्याच पातळीवर जाईल अशी अपेक्षा आहे, कारण यात मानवी भावनांच्या गुंतागुंतीचा वेध घेण्यात येतो. या भिंतींच्या आत प्रत्येक ट्विस्ट एक धडा असतो, आणि प्रत्येक काम एक परीक्षा असते. हृदयाची धडधड कशी वाढते, मनाचे व्यापार कसे चालतात आणि उत्साह कसा शिगेला पोहोचतो हे बघताना एका रोमांचक राईडचा अनुभव मिळेल.”

  कलर्सचा बिग बॉस लवकरच तुमच्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर येत आहे, त्यामुळे अधिक अपडेट्स मिळवत रहा.