कलर्सवरील ‘खतरों के खिलाडी१३’ मधील नायरा एम. बॅनर्जी म्हणते, “खतरों के खिलाडी हा जितका शारीरिक खेळ आहे, तितकाच एक मानसिक खेळदेखील आहे.”

17
“Khatron Ke Khiladi is just as much a mental game as it is a physical one”, says COLORS’ ‘Khatron Ke Khiladi 13’ contestant Nyrraa M Banerjee

मुंबई : कलर्सवरील ‘खतरों के खिलाडी13’त्याच्याजबरदस्त स्टंट्ससह पूर्व तयारीला लागला आहे आणि यातील धाडसी स्पर्धकांमध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीनायरा एम. बॅनर्जीसुद्धा सामील आहे.आपल्या दमदार अभिनयाबद्दल ओळखली जाणारी ही अभिनेत्री, या सीझनमधल्या सर्वात खतरनाक स्टंट्ससाठी कसून तयारी करत आहे.

शो मधील आव्हानांवर मात करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहेच, पण मानसिक आरोग्यही महत्वाचे आहे असे नायरा बॅनर्जी मानते. इतरांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण घालून देत,आपल्या मनाच्या तयारीसाठी ती ध्यानधारणा आणि नियमितपणे स्वतःची काळजी घेण्यात गुंतलेली आहे. नायराने आपल्याभीतीवर मात करून शोमध्ये विजयी होण्याचा निर्धार केला आहे.

नायराच्या मते, “‘खतरों के खिलाडी’ हा खरंतरएक शारीरिक खेळ आहे, तसाच तो एक मानसिक खेळ देखील आहे. मला वाटते की, ठंड डोक्याने कोणतंही काम केलं तर आयुष्यात कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. शांत राहण्याने तुम्ही खूप पुढे जाता. मी अनेक तंदुरुस्त लोकांना अनपेक्षित परिस्थितीत कोसळताना बघितले आहे, कारण ते त्या परिस्थितीत शांत नव्हते.

मी एक तासभर ध्यानधारणा करून माझी स्वतःची काळजी घेत मजेत आहे. तुम्ही स्वतःचे खास मित्रबनणे आणि ज्या कृतींनी तुमच्यातील ऊर्जा कमी होते त्या बंद करणे हे खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारे मी नकारात्मकतेवर मात करते. मी इतर लोकांच्या जीवन संघर्षाच्या कथांमधून बरेच काही शिकत आहे. मी त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, जेणेकरून शो सुरू होण्याआधी मी माझ्या उत्तम मानसिक स्थितीत असेन.”

कलर्सवरील खतरों के खिलाडी 13 चे अपडेट्स येथेच मिळवत राहा!