कलर्सवरील ‘खतरों के खिलाडी 13’ अपेक्षेनुसार दणक्यात सुरू आहे आणि त्यातील स्पर्धकांनी केलेले अभूतपूर्व स्टंट प्रेक्षकांना चकित करून सोडत आहेत. अॅक्शन गुरु रोहित शेट्टीचे सूत्रसंचालन लाभलेला हा लोकप्रिय स्टंट आधारित रियालिटी शो माणसाची अमर्याद क्षमता आणि त्याची हिंमतीची प्रचिती देतो. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि भीतीदायक स्टंट सादर करणारी या शोची 13वी आवृत्ती म्हणजे भीती विरुद्ध खिलाडी अशी रणधुमाळीच आहे. सगळे स्पर्धक आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, टार्गेट वीकमध्ये पुन्हा एकदा नायरा एम. बॅनर्जीसमोर परास्त झालेली अंजुम फकीह दुसऱ्यांदा एलिमिनेट झाली आहे.
अंजुमचा प्रवास हेलिकॉप्टरशी संबंधित एका थरारक स्टंटने सुरू झाला होता आणिपहिल्या आठवड्यात तीची मैत्रीण रूही चतुर्वेदी बऱ्याचशा स्टंट्समध्ये तिच्या सोबतच होती. त्यांनी परफॉर्म केलेले दोन भयंकर स्टंट होते- ते म्हणजे सी-सॉ चॅलेंज आणि कार आणि ट्रॉली चॅलेंज. यापैकी दुसऱ्या स्टंटविषयी बोलतानाआपण वर्षानुवर्षे या भीतीवर मात करण्यासाठी झगडत असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतरच्या स्टंटमध्ये अंजुम झळकली. यामध्ये सरपटणारे प्राणी आणि सापांविषयी तिच्या मनात असलेल्या भीतीचा तिने धैर्याने सामना केला. अनेक किळसवाण्या आणि भीतीदायक किड्यांनी भरलेल्या बॉक्समधून किल्ली काढून स्वतःला मोकळे करण्यात ती यशस्वी झाली. हा चॅलेंज पार पडताना तिने जे दृढ मनोबल दाखवले, आणि आपली एकाग्रता दाखवली, त्यांचे सर्व स्पर्धकांनी आणि स्वतः होस्टने देखील कौतुक केले.
तिसऱ्या आठवड्यात अंजुमवर ऐश्वर्या शर्माने मात केली आणि अल्टीमेट खिलाडी बनण्याच्या शर्यतीतून अंजुम बाहेर झाली. परंतु, दोन आठवड्यांपूर्वी ती पुन्हा एकदा या शोमध्ये दाखल झाली आणि आपली दुसरी इनिंग तिने दणक्यात सुरू केली. ‘डरती है पर करती है’ अशी तिची ओळख बनली कारण आपल्या मनातील भीतीचा तिने धैर्याने सामना केला आणि सगळ्यांना थक्क करून सोडले. टार्गेट वीकमध्ये अंजुमची प्रकृती नरम होती. त्यामुळे सर्व क्षमतेनिशी ती परफॉर्म करू शकली नाही. पण या शोमधली तिची वाटचाल नक्कीच प्रेरणा देणारी होती.
‘खतरों के खिलाडी 13’ला निरोप देताना अंजुम फकीह म्हणते, “खतरों के खिलाडी 13 च्या या प्रवासाबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतःची ओळख पटवून देणारा हा प्रवास होता. स्वतःच्या मनावर ताबा कसा मिळवायचा हे मी शिकले. ही मौल्यवान शिकवण आयुष्यभर माझ्या सोबत राहील. या थरारक साहसात मला मदत करणाऱ्या सगळ्या सह-स्पर्धकांची आणि प्रेक्षकांची मी ऋणी आहे. या शोमधील माझ्या सिद्धींचा अभिमान बाळगणारे लोक माझ्या आसपास आहेत, हे माझे भाग्य आहे. रोहित सरांना विशेष धन्यवाद. ते आमच्याबद्दल जो विश्वास दाखवतात त्यामुळेच आमच्यातील क्षमता बाहेर येतात. या शोमध्ये अत्यंत भीतीदायक गोष्टींचा सामना केल्यानंतर आता आयुष्य आधीसारखे असणार नाही!”
जिगरबाज स्पर्धकांचा रोमांचक प्रवास बघा, मारुती सुझुकी प्रेझेंट्स ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये, ज्याचे स्पेशल पार्टनर आहेत सेरा सॅनिटरीवेअर आणि हा शो प्रसारित होतो दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:00 वाजता फक्त कलर्सवरून!