कलर्सवरील आगामी मालिका ‘सुहागन’मध्‍ये बालकलाकार आकृती शर्मा व कुरांगी व्‍ही नागराज प्रमुख भूमिकेत 

55
पुणे : कलर्सवरील आगामी मालिका ‘सुहागन’मध्‍ये बालकलाकार आकृती शर्मा व कुरांगी व्‍ही नागराज प्रमुख भूमिकेत. जीवनाची सुरूवात कुटुंबापासूनच होते आणि कुटुंबियांचे प्रेम कधीच आटत नाही. पण, सर्वांनाच प्रेमाचे वरदान मिळत नाही. या कटू वास्‍तवावर प्रकाश टाकत कलर्स लवकरच नवीन मालिका ‘सुहागन’ घेऊन येत आहे. ही मालिका बिंदीयाच्‍या हृदयस्‍पर्शी कथेला सादर करते, जी प्रतिकूल स्थितीत देखील सकारात्‍मकता व चिकाटी दाखवते. बिंदीया आणि तिच्‍या स्‍वभावाच्‍या विरूद्ध असलेली तिची बहीण पायल यांना त्‍यांच्‍या षडयंत्री नातेवाईकांच्‍या स्‍वार्थीपणाचा सामना करावा लागतो. बिंदीया पायलची काळजी घेण्‍याची जबाबदारी घेते, त्‍यांना सामना कराव्‍या लागणाऱ्या आव्‍हानांखेरीज ती पायल सुरक्षित असल्‍याची खात्री घेते आणि तिची काळजी देखील घेते. मालिका ‘सुहागन’ उत्तरप्रदेशच्‍या पार्श्‍वभूमीवर स्थित आहे आणि या मालिकेमध्‍ये बालकलाकार आकृती शर्मा व कुरांगी नागराज असणार आहेत, ज्‍या अनुक्रमे लहान बिंदीया व पायलची भूमिका साकारणार आहेत. रश्‍मी शर्मा निर्मित आणि विवेक बहल यांची संकल्‍पना असलेली ही मालिका कुटुंब, प्रेम व फसवणूकीच्‍या रोमांचक कथेला सादर करण्‍याचे वचन देते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.
लवकरच बिंदीयाची भूमिका साकारण्‍यास सज्‍ज असलेली आकृती शर्मा म्‍हणाली, ‘‘मला कलर्सवरील मालिका ‘सुहागन’चा भाग असल्‍याचे माझे भाग्‍य वाटते. ही मालिका सहाय्यक कुटुंब असण्‍याच्‍या महत्त्वाला दाखवते. मला बिंदीयाची भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे. बिंदीयाचा जीवनाप्रती नेहमी सकारात्‍मक दृष्टिकोन आहे. ती प्रबळ व निश्‍चयी मुलगी आहे आणि मी आम्‍ही घेतलेली अथक मेहनत प्रेक्षकांना पाहताना बघण्‍यास उत्‍सुक आहोत.’’
पायलची भूमिका साकारण्‍यास सज्‍ज असलेली कुरांगी व्‍ही नागराज म्‍हणाली, ‘‘मालिका ‘सुहागन’ दोन बहिणींची सुरेख कथा आहे, ज्‍यांना त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांच्‍या स्‍वार्थीपणाबाबत माहित नाही. मी उत्‍साही मुलगी पायलची भूमिका साकारण्‍यास उत्‍सुक आहे, जिचे सर्वोत्तम जीवन असण्‍याचे स्‍वप्‍न आहे. मालिकेचा सर्वोत्तम पात्रांसह रोमांचक कथानक सादर करण्‍याचा मनसुबा आहे. मी आशा करते की, प्रेक्षक या भूमिकेला स्‍वीकारतील आणि मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतील.’’
मालिका ‘सुहागन’ लवकरच सुरू होत आहे फक्‍त कलर्सवर