कलर्सवरील ‘खतरों के खिलाडी’ भयंकर साहसांनी आणि धोक्यांनी भरलेली 13 वी आवृत्ती घेऊन येत आहे. जंगलाचे थीम असलेल्या या आगामी सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 14 स्पर्धक असतील. ते सगळे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात भयानक आव्हानांचा सामना करताना दिसतील. लोकप्रिय दिग्दर्शक आणि अॅक्शनचा उस्ताद रोहित शेट्टी पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसेल आणि आपल्या भीतीचा सामना करणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन करेल. एंडेमॉल शाईन इंडियाद्वारा निर्मित ‘खतरों के खिलाडी 13’ लवकरच कलर्सवर येत आहे.
. परदेशातील उष्णकटिबंधीय जंगलाचा अनुभव मी पहिल्यांदाच घेणार आहे, आणि तो देखील माझ्या मनातील भीतीशी झुंज देत असताना! मी चित्रपटांमध्ये दक्षिण आफ्रिका हा देश पाहिला आहे आणि तो अद्भुत आहे! तो प्रत्यक्षात कसा आहे हे बघण्यासाठी मी अगदी आतुर झालो आहे. मी माझ्यासोबत काय काय सामान न्यायला हवे याबाबत मी माझ्या एका अनुभवी मित्राचा सल्ला घेतला. मी माझ्यासोबत माझे कपडे, प्रोटीन पावडर, प्रोटीन बार्स, ट्रिमर, सकारात्मकता, गणपतीची मूर्ती, काही शूज, केसांची निगा राखण्याची काही उत्पादने, मॉइस्चराइजर, सनस्क्रीन, फोन चार्जर, इयर पॉड आणि औषधे वगैरे घेणार आहे.
मला सिंहांशी निगडीत काही आव्हाने द्यायला आवडतील. मला सिंह भुरळ घालतात. मला सिंह फार आवडतो आणि मला वाटते की त्याचा थाट खरोखर राजासारखा असतो. सिंघमचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि दक्षिण आफ्रिकेचा अस्सल सिंबा यांना एकत्र बघायला नक्कीच खूप मजा येईल.
त्यांना प्रामुख्याने आनंद झाला आणि थोडीशी चिंताही वाटली. माझ्या वडिलांनी मला विचारले की ते सुरक्षित असते ना! मी त्यांना खात्री दिली की हे सुरक्षित असणारच! माझी हीच प्रार्थना आहे की, माझ्या घरच्यांना आणि मित्रांना माझा अभिमान वाटावा आणि या शोमध्ये माझ्यातील भीतीवर मला मात करता यायला हवी.
मला नाही वाटत, मला कोणत्याही पदार्थाची आठवण येईल, कारण माझ्या मित्राने मला सांगितले आहे की, तिकडे खूप छान छान पदार्थ मिळतात. दक्षिण आफ्रिकेचे खास खाद्यपदार्थ चाखून बघण्यास मी उत्सुक आहे. मालवा पुडिंग आणि मलय करी मी कधी चाखतोय असं मला झालंय. पण मला वाटतं मुंबईच्या रस्त्यावर मिळणाऱ्या अंडा बुर्जीची मला नक्की आठवण येईल.
फोनद्वारे मी सगळ्यांच्याच संपर्कात असेन. त्यामुळे मी कुणाला मिस नाही करणार. त्याचे आणखी एक कारण म्हणजे मला वर्तमानात जगायला आवडते. मला या शो ला 100% योगदान द्यायचे आहे आणि जंगलात राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे. माझ्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत असताना वर्तमानात जगणे आणि परिस्थितीचे भान असणे याचा मला मनावर ताबा मिळवण्यासाठी फायदा होईल.
. नाही. अजून तरी नाही. मी फक्त अंजुम फकीहला ओळखतो. पण आमच्यात मैत्री अशी नाही. जवळचे मित्र बनायला नेहमी वेळ लागतो आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतात. आम्ही सर्व स्पर्धक आमच्या शारीरिक क्षमता एकत्र राहून वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण होईल, असे मला वाटते.
मला वाटते, शिव ठाकरे हा एक दमदार प्रतिस्पर्धी ठरेल. टास्कवर आधारित काही रियालिटी शोजमधल्या त्याच्या प्रवासाची झलक मी बघितली आहे. आपले प्रसंगावधान आणि शारीरिक क्षमता दाखवून त्याने सगळ्यांना प्रभावित केले आहे.
होय तर, मी पाहिला आहे. या शोमध्ये जो रोमांच आणि उत्तेजना असते, ती मला फार आवडते. या शोमध्ये माझ्या अनेक मित्रांनी या पूर्वी सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी एक म्हणजे शब्बीर अहलुवालिया, जो अप्रतिम आणि अस्सल होता! त्याने सगळे स्टंट ज्या सातत्याने आणि निर्धाराने केले ते स्फूर्ती देणारे होते. त्याच्यातील ऊर्जा कधीच कमी झालेली दिसली नाही.
मी आत्ताच ते सांगितले, तर ते माझ्या विरोधात जाऊ शकते! मागच्या सीझनमध्ये श्रुती झाने केलेला हेलिकॉप्टर स्टंट करायला मला फार आवडेल. हा असा स्टंट आहे, जो प्रत्येक अॅक्शन हीरोला करावासा वाटतो.
मी वर्कआउट करून माझी ताकद आणि स्टॅमिना वाढवत आहे. पाण्याखाली जितका वेळ श्वास रोखून धरता येईल, तितका वेळ ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
माझ्या डोक्यात येणारी पहिली भीती म्हणजे, उंचीची भीती! फक्त कल्पना करतानाही मला असं वाटतं की मला व्हर्टिगोचा त्रास सुरू होईल. उंचीबद्दलच्या या भीतीवर मला मात करायची आहे.