कलर्सच्या खतरों के खिलाडी 13 मध्ये आपल्यातील भीतीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे अंजली आनंद

45

कलर्सच्या खतरों के खिलाडी 13 मध्ये आपल्यातील भीतीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे अंजली आनंद मनाचा थरकाप उडवणारा थरार बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण कलर्सवर भारताचा लाडका स्टंट-आधारित रियालिटी शो ‘खतरों के खिलाडी’ आपली 13 वी आवृत्ती घेऊन दणक्यात पुनरागमन करत आहे. यावेळी नवीन थीम आणि नवीन आव्हानांसह हा शो आणखीनच मोठा, जबरदस्त आणि धाडसी असणार आहे. हा शो त्यातील स्पर्धकांना एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जाईल. खतरनाक साहसांसाठी आपल्या मनाची तयारी करा कारण, विविध क्षेत्रातून आलेले धाडसी स्पर्धक अत्यंत भयानक परिस्थितीचा सामना करताना दिसणार आहेत. या दंगलीत आता सामील होत आहे धडाकेबाज अंजली आनंद, जी आता खतरों के खिलाडी 13 मध्ये स्वतःची क्षमता सिद्ध करण्यास आणि आपल्या धैर्याची मोठी कसोटी देण्यास सज्ज झाली आहे. हा अभूतपूर्व रोमांच अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?

या स्टंट-आधारित शोमधील सहभागाविषयी अंजली म्हणते, “खतरों के खिलाडीच्या सर्व सहभागींविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. कारण, स्वतःच्या मनातील भितीवर मात करत टेलिव्हिजनवर काही दमदार सेलिब्रिटीजशी स्पर्धा करणे काही सोपे काम नाही. मी माझ्या मनातील भीतीशी लढण्यास आणि इतर स्पर्धकांसमवेत नव्या प्रांताची मुशाफिरी करण्यास तयार आहे. मी तशी सहजासहजी घाबरत नाही, त्यामुळे या शोमध्ये मी आव्हानांचा सामना कसा करते आणि माझ्यापुढे या सत्रात ककोणते धक्के आणि धोके असणार आहेत हे बघण्याची मला उत्सुकता आहे.”