पुणे : ‘तुझ्यामुळे माझा व्यवसाय बसला असून, घर मोडले, आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही’ अशी धमकी सातत्याने ऑनलाईन रमी खेळणाऱ्याने आपल्याच आत्ते भावाला दिल्याची घटना घडली असून धमकी मिळालेल्या भावाने यासंदर्भात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गुंडाप्पा खडके (वय ३१, रा. धायरी) यांनी किशोर विठ्ठल पिसके (रा. संतोषनगर बाळे, उत्तर सोलापूर, सोलापूर) यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर पिसके हा गेल्या तीन वर्षांपासून ‘ऑनलाईन रमी’ खेळत असून यात त्याने लाखो रुपये हरला आहे.
हेही वाचा : होळी सणामागील शास्त्र
ऑनलाईन रमी खेळताना त्याने स्वतःचे पैसे हरला असून हा खेळ खेळण्यासाठी अनेकांकडून कर्ज देखील घेतले आहे. यामुळे तो मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी देखील झाला आहे.
तक्रारदार हे आरोपीचे अत्ते भाऊ असून आरोपीने त्यांच्याकडून देखील मोठी रक्कम हात उसने घरी लागणार आहेत आणि दुकानात साहित्य भरण्यासाठी घेतली होती.
मात्र, जेव्हा तक्रारदाराने आपण दिलेले पैसे मागितले त्यावेळीपासून आरोपीने त्यांचा फोन उचलणे किंवा संपर्क करण्यास टाळाटाळ करत होता. आरोपीच्या वागण्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने थेट आरोपीचे सासरे महेश भुंजकर (रा. बेल्लारी, कर्नाटक) यांना फोन करून यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर देखील आरोपीने तक्रारदाराचे घेतलेले कर्ज परत केले नाही तसेच तक्रारदार करत असलेल्या संपर्कांला देखील आरोपीने उत्तर दिले नाही. शेवटी आरोपीच्या सासरे यांना फोन करून तक्रारदाराने आरोपी कुठे आहे अशी विचारणा केली असता, त्यांच्या सोबतच असणाऱ्या आरोपीने फोन घेतला व ‘तुझ्यामुळे माझा व्यवसाय बसला असून, घर मोडले, आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही’ अशी धमकी तक्रारदाराला दिली. त्याचे वडील सुद्धा त्याच्या या कृत्याला खूप वैतागले आहेत त्या मुळे दिलेल्या धमकीनुसार तक्रारदार यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ५०७ प्रमाणे तक्रार नोंदविली आहे.