एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी केली२९,५८९ कोटी रुपयांच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंदणी

52

एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी केली२९,५८९ कोटी रुपयांच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंदणी देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी २९,५८९ कोटी रुपयांच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंदणी केली. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी हीच नोंदणी २५,४५७ कोटी रुपये होती. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या संबंधित वर्षाच्या तुलनेत नियमित प्रीमियम मध्ये १७% ने वाढ झाली आहे.

संरक्षणावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून, ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात  एसबीआय लाइफच्या संरक्षणाचा नवीन व्यवसाय प्रिमियम ३,६३६ कोटी रुपये इतका झाला असून त्यात १९% वाढ झाली आहे. प्रोटेक्शन इंडिव्हिज्युअल नवीन व्यवसाय प्रीमियमने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात ६% ची वाढ नोंदवली असून ९९६ कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या संबंधित वर्षाच्या तुलनेत २७% वाढीसह इंडिव्हिज्युअल नवीन व्यवसाय प्रीमियम २०,९०६ कोटी रुपये झाला आहे.

एसबीआय लाइफचा करानंतरचा नफा ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात १,७२१ कोटी रुपये इतका आहे.

१.५० च्या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत ३१ मार्च २०२३ रोजी कंपनीचा सॉल्व्हेंसी रेशो २.१५  वर मजबूत राहिला आहे.

७१:२९ च्या डेब्ट इक्विटी मिक्ससह एसबीआय लाइफचे एयूएम देखील ३१ मार्च २०२२ रोजीच्या २,६७,४०९ कोटी रुपयांवरून १५% ने वाढून ३१ मार्च २०२३ रोजी ३,०७,३३९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. ९४% पेक्षा जास्त डेब्ट गुंतवणूक एएए आणि सार्वभौम साधनांमध्ये आहे.

कंपनीकडे २,७५,३७४ प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क असून देशभरात कंपनीने ९९२ कार्यालयांसह विस्तृत स्थान मिळविले आहे. त्यामध्ये मजबूत बँकासुरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (POS), विमा विपणन कंपन्या, वेब अॅग्रीगेटर आणि थेट व्यवसाय यांचा समावेश आहे.