पुणे, : देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडच्या (एलटीएफएच) ८ जून २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांसाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता प्रतिशेअर दोन रुपये (दहा रुपये दर्शनी मूल्य) अंतिम लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत जाहीर केलेला हा सर्वाधिक लाभांश आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सभासदांनी मंजूर केल्यानंतर हा लाभांश एजीएमच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत दिला जाईल.
कंपनीच्या कामगिरीबद्दल बोलताना एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीनानाथ दुभाषी, म्हणाले, कंपनीची ही घोषणा शाश्वत उत्पन्न, भागधारकांना मूल्य वितरीत करण्याचा आमचा विश्वास प्रकट करते त्याचबरोबर कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती सकारात्मकरीत्या प्रतिबिंबित करते. आम्ही वर्षभरात सर्व बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आमच्या आर्थिक निकालांतून ही बाब प्रकट होते. आर्थिक वर्ष २३ मध्ये २४.५२ टक्के भांडवली पर्याप्तता गुणोत्तर तसेच रोखतेच्या पुरेशा प्रमाणासह मजबूत आर्थिक ताळेबंदाच्या जोडीला व्यवसायातील सक्षम कामगिरीमुळे लक्ष्य २०२६ हे उद्दीष्ट गाठण्याच्या मार्गावर कंपनी अतिशय योग्य पध्दतीने वाटचाल करत आहे.
“लक्ष्य योजनेच्या पहिल्या वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष २३ मध्ये आम्ही राबविलेल्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आम्हाला ७५ टक्के रिटेलीकरण साध्य करण्यात मदत झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या ८० टक्क्यांहून अधिक रिटेलीकरण उद्दिष्टाच्या जवळपास आम्ही पोहचलेलो आहोत. आम्ही कंपनीच्या सात लाख समभागधारकांसह आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी वचनबद्ध आहोत. यापुढेही वाटचाल करताना आम्ही ग्राहक-केंद्रित आणि शाश्वत फिनटेक अॅट स्केल म्हणजेच भव्य फिनटेक यंत्रणा तयार करण्याच्या दिशेने आमची गती कायम ठेवू. कंपनी ग्राहकांच्या संपुर्ण आर्थिक परिघाला कवेत घेणारी नानाविध रिटेल साधने (रिटेल प्रॉडक्टस्) सादर करत राहणार असून त्यामुळे परस्परांना संपर्करहित पूरक विक्री यंत्रणा (क्रॉस-सेल), शाखा पातळीवर वाढती विक्री यंत्रणा आणि इष्टतम वितरण धोरण तयार होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने १६२३ कोटी रुपयांचा (एकत्रित) करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. त्यात वार्षिक ५२ टक्के वाढ साध्य केलेली आहे. एलटीएफएचने रिटेलच्या विविध प्रकांरात अतिशय जोरदार वाढीच्या जोरावर ४२ हजार ६५ कोटी रुपयांचे उच्चांकी वार्षिक रिटेल कर्जवितरण साध्य केले आहे. याशिवाय कंपनीने घाऊक कर्ज पुस्तिकेत (होलसेल बुक) अतिशय वेगवान कपात साध्य करताना गतवर्षाच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी घटवून ते कर्ज १९ हजार ८४० कोटी रुपयांवर आणले आहे. तसेच कंपनीच्या घाऊक कर्जवितरणाची रक्कम (रिटेल बुकसाईझ) ६१ हजार ५३ कोटी रुपये असून त्यात वार्षिक ३५ टक्के वाढ झाली आहे.