एल अँड टी कन्स्ट्रकशनस् ने त्यांच्या जल आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण कंत्राट मिळविले

77

मुंबई, जानेवारी ०३,२०२३ : एल अँड टी कन्स्ट्रकशनस् च्या जल आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवसायाला मध्यप्रदेश सरकारकडून  राज्यातील देवास आणि धार जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावांचा समावेश असलेल्या २,०५,००० हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्यासाठी दोन उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ‘टर्नकी’ वर आधारित (डिझाईन पासून ते निर्माण, प्रशिक्षण, निरीक्षण इत्यादी सर्व कामे कंत्राटदाराने करावी या बोलीवर) कंत्राट पुन्हा मिळाले आहे.

या कंत्राटानुसार, सर्वेक्षण, डिझाईन, खरेदी, पंपहाऊस बांधणे, अभियांत्रिकी, पंप केलेल्या पाण्यासाठी पाइपलाइन (Rising Main) टाकणे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन (Gravity Main) टाकणे, वितरण नेटवर्क आणि या संपूर्ण प्रणालीचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी SCADA (Supervisory Control and data acquisition ) पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा अधिग्रहण या सर्व कामांचा  समावेश आहे.

या सिंचन प्रकल्पामुळे शेत  जमिनींसाठी नर्मदा नदीतून ६० क्युमेक् पाणी आणले जाईल आणि याचा ३,००,००० शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतीतील उपकरणे व ऑटोमेटेड व्हॉल्व्ह सह अत्याधुनिक ऑटोमेशन प्रणाली रब्बी हंगामात चोवीस तास पाणी पुरवठा सुनिश्चित करेल.

हे कंत्राट सिंचन क्षेत्रातील एल अँड टी च्या श्रेयाची पुष्टी करतो आणि राज्यातील कृषी विकासास मदत करण्याची आमची क्षमता आहे हा ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करतो.