एलिन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे प्रति इक्विटी शेअर ₹ २३४ ते ₹ २४७च्या किंमतीचा बँड निश्चित करून, तिच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरचा २० डिसेंबर, २०२२ रोजी शुभारंभ

94

पुणे, १६ डिसेंबर २०२२ : एलिन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही, भारतातील लाइटिंग, पंखे आणि लहान/किचन उपकरणांच्या प्रमुख ब्रँडसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत (एंड-टू-एंड) प्रॉडक्ट सोल्यूशन्सची एक अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवां (“EMS”)ची उत्पादक आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर्स उत्पादकांपैकी एक आहे. तिने तिच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर  234 ते  247 किंमतीचा बँड निश्चित केला आहे. कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (“IPO” किंवा “ऑफर”), मंगळवार, 20 डिसेंबर, 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि गुरुवारी, 22 डिसेंबर, 2022 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार, किमान 60 इक्विटी शेअर्सच्या आणि त्यानंतर 60 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.

या पब्लिक इश्यूमध्ये, ₹ 5 प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यासह, एकूण ₹ 175 कोटी पर्यंतचा नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांद्वारे ₹ 300 कोटी पर्यंतची विक्रीसाठी ऑफर (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे.

विक्रीसाठी ऑफर (ऑफर फॉर सेल)मध्ये, कमल सेठिया यांच्याद्वारे ₹ 17.18 कोटी पर्यंत, किशोर सेठिया यांच्याद्वारे रु. 28.09 कोटी पर्यंत, गौरव सेठिया यांच्याद्वारे 25.37 कोटी पर्यंत, सुमित सेठिया यांच्याद्वारे ₹ 6.66 कोटी पर्यंत, सुमन सेठिया यांच्याद्वारे ₹   30.52 कोटी पर्यंत, वसुधा सेठिया यांच्याद्वारे ₹  8.33 कोटी पर्यंत, विनय कुमार सेठिया यांच्याद्वारे ₹ 4.96 कोटी पर्यंत, (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), आणि इतर सेलिंग शेअरहोल्डर्स (“अदर सेलिंग शेअरहोल्डर्स”)द्वारे ₹ 178.88 कोटी पर्यंतचा समावेश आहे.

एकूण बाजाराच्या आधारावर, आर्थिक वर्ष 2021 मधील बाजार हिश्श्याच्या 12% सह, एलिन इलेक्ट्रॉनिक्स ही, या श्रेणीतील सर्वात मोठी कंपनी आहे. शिवाय, आर्थिक वर्ष 2021 मधील अंदाजे 7%च्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवे (EMS)च्या बाजार हिश्श्याच्यासह, ती, लाईट-इमिटिंग डायोड (LED) लाइटिंग आणि फ्लॅशलाइटमध्ये प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे, आणि आर्थिक 2021 मधील 10.7%च्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवे (EMS)च्या बाजार हिश्श्यासह, स्मॉल अप्लायंसेस व्हर्टिकलमधील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. (स्रोत: एफ अँड एस अहवाल)

कंपनीद्वारे आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरण ब्रँडसह भागीदारी केली आहे, जसे की, लाईट-इमिटिंग डायोड (LED) लाइटिंग, पंखे आणि स्विचेससाठी सिग्निफाय इनोव्हेशन्स आणि एव्हरीडी;  छोट्या उपकरणांसाठी फिलिप्स, बॉश, फॅबर, पॅनासोनिक आणि उषा; फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर्ससाठी हॅवेल्स, बॉश, फॅबर, पॅनासोनिक, प्रीथी (फिलिप्सच्या मालकीची), ग्रुप एसईबी (महाराजा ब्रँड) आणि उषा; तसेच मेडिकल डायग्नोस्टिक कार्ट्रिजेससाठी मोल्बियो डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मोल्डेड आणि शीट मेटल भाग आणि घटकांसाठी, डेन्सो आणि आयएफबी (IFB).

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवे (EMS)मधील कंपनीच्या मुख्य वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पुढील उपकरणे समाविष्ट आहेत: लाईट-इमिटिंग डायोड (LED) लाइटिंग, पंखे आणि स्विचेससह लायटनिंग प्रॉडक्ट्स, सीलिंग, फ्रेश एयर आणि टीपीडब्ल्यू (TPW) पंखे आणि मॉड्यूलर स्विचेस आणि सॉकेट्स; लहान उपकरणे जसे की, ड्राय अँड स्टीम आर्यन, टोस्टर्स, हँड ब्लेंडर्स, मिक्सर ग्राइंडर, हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनर; मिक्सर ग्राइंडर, हँड ब्लेंडर, वेट ग्राइंडर्स, चिमणी, एअर कंडिशनर, हीट कन्व्हेक्टर, टीपीडब्ल्यू (TPW) पंखे इत्यादींमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर्स; आणि इतर विविध उत्पादने जसे की, एअर कंडिशनरसाठी टर्मिनल ब्लॉक, मिक्सर ग्राइंडरसाठी स्टेनलेस स्टील ब्लेड, डाय कास्टिंग, रेडिओ सेट.

मुख्यतः गृह आणि वैयक्तिक उपकरणांच्या ग्राहकांच्या खरेदीत झालेल्या वाढीमुळे, आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल, 862.38 कोटी रुपयांवरून 26.83% वाढून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये ₹ 1,093.75 कोटी झाला, तर करानंतरचा नफा, आर्थिक वर्ष 2021 मधील ₹ 34.86 कोटी रुपयांवरून 12.31% वाढून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये ₹ 39.15 कोटी झाला.

30 सप्टेंबर, 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल 604.46 कोटी रुपये होता आणि करानंतरचा नफा, 20.67 कोटी रुपये होता.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जे एम फायनान्शियल लिमिटेड हे, या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे, ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. इक्विटी शेअर्स, बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE)च्या मुख्य बोर्डावर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.