एमटीव्ही (MTV) रोडीजसाठी पुणे ऑडिशन – ‘कर्म या कांड’, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आणि भयंकर स्पर्धा बघण्याचे साक्षीदार बना!

59
एमटीव्ही (MTV) रोडीजसाठी पुणे ऑडिशन – ‘कर्म या कांड', मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आणि भयंकर स्पर्धा बघण्याचे साक्षीदार बना!

एमटीव्ही (MTV) रोडीजसाठी पुणे ऑडिशन – ‘कर्म या कांड’, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आणि भयंकर स्पर्धा बघण्याचे साक्षीदार बना! भारताच्या एमटीव्ही ((MTV) रोडीजसाठी ऑडिशन – पुण्यात ‘कर्म या कांड’ हा, महत्वाकांक्षी स्पर्धकांच्या प्रचंड उपस्थितीसह एक प्रचंड यशस्वी कार्यक्रम ठरला आणि यातील स्पर्धकांची ही उपस्थिती, शो च्या निरंतर लोकप्रियतेचा पुरावा म्हणून सिद्ध झाली! पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे 22 एप्रिल, 2023 रोजी झालेल्या बहुप्रतीक्षित सीझन 19 च्या ऑडिशनने शहरातील आणि त्याच्या शेजारच्या भागातील तरुणांना आकर्षित केले.

यजमान सोनू सूद आणि गँग लीडर्स प्रिन्स नरूला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी यांच्यासह, या कार्यक्रमाचा अनुभव अतिशय उत्साहपूर्ण आणि उर्जेने भरलेला होता. गँगच्या लीडर्सनी स्पर्धकांशी परस्पर संपर्क साधला आणि त्यांना त्यांची सर्वोत्तम कामगिरी पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केले! स्पर्धकांनी सामूहिक चर्चेच्या फेऱ्या पार पाडून, त्यांची शक्ती, सहनशक्ती आणि मानसिक ताकद दर्शविली आणि आता शॉर्टलिस्टेड रोडीज, वैयक्तिक मुलाखतीच्या फेरीत पुढे जातील!

पुण्यातील ऑडिशन्स हे, भारतातील सर्वात मोठ्या साहसी रिअॅलिटी टेलिव्हिजन शो, एमटीव्ही (MTV) रोडीज – ‘कर्म या कांड’, एक रोमांचक सीझन असल्याचे सुनिश्चित करतात.  हा शो नेहमीच त्याच्या उच्च – स्तरीय आव्हानांसाठी आणि खडतर अशा कार्यांसाठी ओळखला जातो आणि पुणे ऑडिशनमधून निवडलेल्या स्पर्धकांना, त्यांचा ए – गेम स्पर्धेत आणण्याची खात्री आहे.

एमटीव्ही (MTV) रोडीज ‘कर्म या कांड’ विषयी अधिक जाणून घेण्यासाठी लक्ष ठेवा, कारण ते त्यांचा 19 वा सीझन सादर करणार आहेत!