एमजी मोटर इंडिया द्वारे स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन एमजी कॉमेट ईव्ही पुण्यात लाँच

51
Smart Electric Vehicle MG Comet EV launched in Pune by MG Motor India

पुणे :  ब्रिटिश ऑटोमोबाईल ब्रँड एमजी मोटर इंडियाने आज पुण्यात तिच्या स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल, एमजी कॉमेट ईव्हीचे अनावरण केले. अष्टपैलू जीएसईव्ही – प्लॅटफॉर्म – आधारित प्युअरईव्ही (PureEV)मध्ये किमान परंतु प्रशस्त डिझाइन आहे आणि त्यात अशी अंतर्निहित चपलता आहे जिच्यामुळे शहरात निर्बध, तणावमुक्त प्रवास करता येऊ शकतो. कॉमेट ईव्ही ही, एमजी मोटर इंडियाच्या पोर्टफोलिओमधील दुसरी ईव्ही आहे आणि ती, भविष्यातील आणि वापरकर्ता – अनुकूल स्मार्ट तंत्रज्ञानासह येते.  स्मार्ट ईव्ही – एमजी कॉमेट ७,९८,००० (एक्स – शोरूम) च्या विशेष परिचयात्मक किंमतीत उपलब्ध होईल.

  •     कॉमेट ईव्ही, ७,९८,००० रुपयांच्या सुरुवातीच्या एक आकर्षक किंमतीत उपलब्ध होईल
  •     दरमहा ५१९  रुपयांच्या कमी खर्चाच्या चार्जिंगच्या किंमतीवर कार्य करते

या प्रसंगी बोलताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “शहरी गतिशीलतेच्या उत्क्रांतीमध्ये एक निर्णायक क्षण म्हणून, एमजी कॉमेट ईव्ही भारतात लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. कॉमेट ईव्ही ही फक्त एक कारपेक्षा बरीच काही अधिक आहे; तिच्याद्वारे आम्ही आमच्या शहरांमध्ये प्रवास करण्याची पद्धत बदलण्याच्या आमच्या दृढनिश्चयाचे प्रतिनिधित्व करते.

“कॉमेट ईव्ही शुद्ध इलेक्ट्रिक जीएसईव्ही प्लॅटफॉर्मवर निर्माण केली गेली आहे, जी जागतिक स्तरावर १ दशलक्ष ईव्ही विक्रीच्या खुणेपर्यंत पोहोचणारी सर्वात वेगवान ईव्ही आहे. कारद्वारे सहजपणे शैली, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचे मिश्रण केले जाते आणि अद्वितीय अशा सुरक्षा वैशिष्ट्यांसह एक अष्टपैलू आणि प्रशस्त राईड देऊ केली जाते. एमजी (MG) मध्ये, आम्हाला समजते की, गतिशीलतेचे भविष्य इलेक्ट्रिक आहे आणि कनेक्टेड आहे. कॉमेट ईव्हीसह, आम्ही आमच्या ग्राहकांना शैली किंवा सोयीनुसार तडजोड न करता स्मार्ट निवड करण्यास सक्षम बनवण्याचे लक्ष्य ठेवतो,” ते पुढे म्हणाले.

एमजी कॉमेट ईव्हीचे डिझाइन हे, फ्युचर – टेक जगाला प्रकट करते. बिको (BICO) – ‘बिग इनसाइड, कॉम्पॅक्ट आउटसाइड’ या संकल्पनेवर निर्माण करण्यात आलेली, कॉमेट ईव्ही आरामासाठी प्रशस्त आणि वर्धित लेगरूम तसेच हेडरूम देऊ करते.  कर्व्ह्ड टेक बॉडी लाइनद्वारे, बाहेरून कॉमेट ईव्हीच्या वायुगतिकीय (एरोडायनामिक) आणि शैलीदार पैलूंवर जोर दिला गेला आहे. कॉमेट ईव्हीच्या बाजू, एक फ्लोटिंग मोटीफसह फ्युचरीस्टिक रियर- व्ह्यू मिरर निर्माण करतात. दुसऱ्या पंक्तीतील एरो- क्राफ्ट केबिन विंडो, कॉमेट ईव्हीमध्ये अतिरिक्त दृश्यमानता प्रदान करते. 

एमजी कॉमेट ईव्हीमध्ये सीटच्या दुसऱ्या ओळीत, ५०:५० सेटिंग्जसह ४-सीटर कॉन्फिगरेशनसह आरामदायक आणि प्रशस्त केबिन आहे. आधुनिक शैलीची केबिनच्या जागेस, आधुनिक शहरी ईव्हीच्या सोई आणि परस्परसंवादी पैलूंना सहाय्य करण्यासाठी अनेक फंक्शन असलेल्या स्मार्ट तंत्रज्ञान कॉन्फिगरेशनसह एकत्र केले गेले आहे. कॉमेट ईव्हीचे मल्टी- फंक्शन आणि अद्वितीय डिझाइन केलेले स्टीयरिंग, स्मार्ट तंत्रज्ञान आणि फ्युचरीस्टिक पॉड – सारख्या नियंत्रणांसह येते, जे ईव्हीला आधुनिक गॅझेटसारखे अनुभव प्रदान करतात. रोटरी गियर सिलेक्टर हे, क्रोम रिंग्स आणि अनोख्या नमुन्यांसह सजावट केलेल्या भविष्यातील रोटरी नॉबसह ट्रान्समिशन ऑपरेशन आहे. याव्यतिरिक्त, सेंटर कन्सोल, इलेक्ट्रिक विंडो ऑपरेशन बटणे आणि १२- व्होल्ट चार्जिंग पोर्टसारख्या उपयुक्त वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Smart Electric Vehicle MG Comet EV launched in Pune by MG Motor India

कॉमेट ईव्हीमध्ये एकाच चार्जवर सुमारे २३०* कि.मी. प्रमाणित बॅटरी श्रेणी आहे. इंटेलिजेंट टेक डॅशबोर्ड विभागात, एमजी कॉमेट ईव्ही अत्याधुनिकतेची एक छटा सादर करते.  इन-बिल्ट आयस्मार्ट सिस्टम, ५५+ कनेक्टेड कार फीचर्स आणि १००+ व्हॉइस कमांडसह येते. यात १०.२५” हेड युनिट आणि १०.२५” मीटर डिजिटल क्लस्टरसह फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले वाइडस्क्रीन आहे. याव्यतिरिक्त, मनोरंजन प्रणाली ग्राहकांना मनोरंजन, आणि कनेक्टिव्हिटी पर्यायांच्या श्रेणीमध्ये प्रवेश देण्यासाठी तीन पूर्णपणे सानुकूलित पृष्ठांसह विजेटसह सुसज्ज आहे. एमजी कॉमेट ईव्हीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट की. की चे आकर्षक आणि स्टाइलिश डिझाइन, कॉमेट ईव्हीच्या टेक-वाइबमध्ये भर घालते.  (डिजिटल की हा, आय-स्मार्टचा एक पैलू आहे, तो स्मार्ट की शी संबंधित नाही).

शहरी – तरुण प्रवाशांसाठी, बचत महत्त्वाची आहे. एमजीने कॉमेट ईव्हीचे मूल्यमापन केले आहे जेणेकरून प्रति १,००० कि.मी.साठी ५१९ रुपयांचा चार्जिंग खर्च होईल.

(** वेगवेगळ्या पॉवर टॅरिफनुसार आकडेवारी बदलू शकतात)

कॉमेट ईव्ही सर्व बाबींमध्ये सुरक्षित आणि मजबूत वाहन आहे, ही प्रिझमॅटिक सेलसह अशा १७.३ कि.वॅ.ता. (kWh) ली – आयन बॅटरी दिली आहे, जिच्यावर अधिक दीर्घ सायकल लाईफसाठी ३९ पेक्षा बॅटरी अधिक कार सुरक्षा चाचण्या केल्या केल्या गेल्या आहेत. तिला आयपी६७ (IP67) असे रेट करण्यात आले आहे त्यामुळे ती धूळ अत्यंत प्रतिरोधक आहे. १७ हॉट स्टॅम्पिंग पॅनलसह उच्च शक्ती वाहन बॉडी, एमजी कॉमेट ईव्हीची संपूर्ण रचना मजबूत आणि सुरक्षित करण्यात आली आहे. स्मार्ट ईव्ही, ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस + ईबीडी, फ्रंट अँड रियर ३ पॉइंट सारख्या सेगमेंट – लीडिंग सक्रिय आणि निष्क्रिय सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते.  सीट बेल्ट, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर, टीपीएमएस (अप्रत्यक्ष) आणि आयसोफिक्स (ISOFIX) चाइल्ड सीट.