एमजी मोटर इंडिया’च्या वतीने कॉमेट ईव्ही पेस, प्ले आणि प्लश तीन प्रकारांत लॉन्च

64

पुणे : एमजी मोटर इंडियाने आज त्यांचे अलीकडे अनावरण करण्यात आलेलं स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन, एमजी कॉमेट ईव्ही’चे पेस, प्ले आणि प्लश हे तीन प्रकार लाँच केले. एमजी कॉमेट ईव्ही—स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन भारतासाठी शहरी मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये एक नवीन युग चिन्हांकित करते. अष्टपैलू जीएसईव्ही प्युअर इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित कॉमेट, नैसर्गिक चपळतेसह आकर्षक आणि प्रशस्त डिझाईनचा अभिमान बाळगते. ज्यामुळे विनाखंड आणि तणावमुक्त शहरी प्रवास करणे शक्य होते. कॉमेट ईव्ही,एमजी मोटर इंडियाच्या लाइन-अपमधील दुसरे इलेक्ट्रिक वाहन, शैली, तंत्रज्ञान आणि टिकाऊपणाचं मिश्रण आहे, जे अतुलनीय सुरक्षा वैशिष्ट्यांसह एक अष्टपैलू ड्राईव्ह उपलब्ध करते.

वाहन प्रकार विशिष्ट शैलीसह उपलब्ध असून वापरकर्त्यांसाठी अॅड-ऑन, एक्सेसरीज, फंकी बॉडी रॅप आणि कूल स्टिकर्सच्या विस्तृत श्रेणीसह वैयक्तिक दिमाखदार पर्याय देतात. कॉमेट ईव्ही पेस व्हेरियंटसाठी रू. ७.९८ लाख रुपयांपासून सुरू होणार्‍या प्रारंभिक किंमतीवर उपलब्ध असेल; प्ले आणि प्लश प्रकार अनुक्रमे रु. ९.२८ लाख आणि ९.९८/- लाख  (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहेत. ही ऑफर पहिल्या ५००० बुकिंगपुरती मर्यादित असेल.

लॉन्च बद्दल बोलताना, एमजी मोटर इंडिया’चे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. गौरव गुप्ता म्हणाले, “कॉमेट हे फक्त एक वाहन नाही. शहरी प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतून आरामात वाट काढण्याचा हा एक चपळ आणि सुरक्षित मार्ग आहे. याचे तिन्ही प्रकार ग्राहकांना केवळ मनःशांतीच देत नाहीत तर भविष्यातील कॉमेट ईव्हीला स्वतःचा रुबाब, चाकांवर ओळखण्या योग्य गॅझेटसाठी सानुकूलित पर्यायांची संधी देखील प्रदान करतात.”