एमजीने जगातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल एमपीव्ही- युनिक ७ प्रदर्शित केली

73
EUNIQ7 FUEL CELL MPV Powered By HYDROGEN Fuel Celi

पुणे,१२ जानेवारी २०२३: शाश्वततेवर मोठा भर देणाऱ्या भारतातील वाहतुकीच्या भविष्यकाळाचे दर्शन घडवत, एमजी मोटर इंडियाने आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आपल्या थर्ड-जनरेशन हायड्रोजन फ्युएल-सेल तंत्रज्ञानाने युक्त अशा न्यू एनर्जी व्हेइकल्सचे (एनईव्ही) दर्शन घडवले.  जगातील आघाडीच्या हायड्रोजन फ्युएल-सेल तंत्रज्ञानातून, पर्यावरणपूरक, नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या आधारावरील पर्यावरणपूरक, कार्यक्षम प्रवासाची साधने पुरवण्याप्रती असलेली, एमजीची बांधिलकी अधोरेखित होते.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा म्हणाले, “एमजी मोटर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नवोन्मेषाचे दुसरे नाव आहे. आम्ही चाकोरीबाह्य वाहतूक उत्पादने देण्याचे उद्दिष्ट ठेवून भारतात आलो. मानवकेंद्री तंत्रज्ञान व शाश्वतता या दोन्ही निकषांवर चाकोरीबाह्य सोल्यूशन्स देण्याचे आमचे उद्दिष्ट होते. वाहनउद्योगात पर्यायी इंधन तंत्रज्ञानांचा शोध सातत्याने सुरू असल्यामुळे, जगातील आघाडीचे फ्युएल-सेल तंत्रज्ञान प्रोम पी३९० भारतात सर्वांपुढे आणताना आम्हाला आनंद होत आहे.”

हायड्रोजनचा उपयोग इंधन म्हणून करणाऱ्या वाहनांचे काही लक्षणीय फायदे म्हणजे ती प्रदूषण करत नाहीत, त्यांची कार्यक्षमता उत्तम असते, ती अधिक भार घेऊ शकतात, इंधन पुनर्भरण वेगाने होते आणि बॅटरीचे आयुष्य दीर्घ असते. प्रोम पी३९० प्रणाली युनिक ७ बाबत या निकषांवर उत्तम कामगिरीचा विश्वास देते. युनिक ७ हे हायड्रोजन फ्युएल-सेल तंत्रज्ञानावर चालणारे वाहन आहे. याचे कार्बन उत्सर्जन शून्य आहे, कारण यातून केवळ पाण्याचे उत्सर्जन होते. शिवाय, हे वाहन हवा शुद्धीकरणाचे काम करते. १५० प्रौढांच्या श्वसनातून जेवढी हवा शुद्ध होते, तेवढीच हवा एक तास हे वाहन चालवल्यामुळे शुद्ध होते.

Read  More  : 

रोमांचकारक, थरार यांच्या शोधात असलेल्यांसाठी महिंद्राने सादर केली ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होणारी थारची नवीन श्रेणी