पुणे : विद्यार्थी व तरूण वर्गातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अभिनव कल्पनांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांतर्गत आयोजित एमआयटी डब्ल्यूपीयू इनोव्हेशन हॅकॅथॉनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकतेच एमआयटी डब्लयूपीयू येथे इनोव्हेशन हॅकॅथॉन 2023 ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा आयडियाथॉन, फॉरमॅथॉन, आंत्रप्रेन्युरिअल, मेड इन एमआयटी डब्ल्यूपीयू आणि वर्कथॉन अशा पाच प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आपल्या स्वत:च्या संकल्पना वापरून त्यांना वास्तविक स्वरुपात सादर करायच्या होत्या.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड उपस्थित होते. याप्रसंगी विटेस्को टेक्नॉलॉजीज पुणेचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री हेड अनुराग गर्ग, टाटा हेंड्रिक्सन सस्पेंशन प्रा.लिमिटेडच्या आरअँडडी, एनपीडी आणि सर्व्हिस विभागाचे प्रमुख आणि उपाध्यक्ष संजीव अन्नीगेरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, बिझदेव- युएस आणि युरोप आणि हार्बिंगर सिस्टम्सचे संचालक अजय तोडकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील हॅकॅथॉनचे समन्वयक डॉ.किशनप्रसाद गुणाले, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, रजिस्ट्रार डॉ.तपन पांडा,एमआयटीडब्ल्यूपीयूचे चीफ अॅकॅडेमिक ऑफिसर डॉ.संजय कामटेकर, हॅकएमआयटीडब्ल्यूपीयू 2023 चे सह-संयोजक डॉ.कृष्णा वर्हाडे, गणेश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले की, आजच्या तरुणांमध्ये कुशाग्र बुध्दिमत्ता, कौशल्य आणि प्रतिभा असून त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी हॅकॅथॉन हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. आपली क्षमता सिध्द करण्यासाठी हॅकॅथॉन सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून काही जण सर्वात प्रतिभावान आणि कुशल युवा म्हणून जागतिक स्तरावर नावलौकिक कमावू शकतात. सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाणे आणि सर्वांगीण शांतताप्रिय समाज विकसित करणे हेच अंतिम ध्येय असायला हवे आणि भारताला यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारायची आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे म्हणाले की, यशस्वीरित्या पार पडलेले हॅकॅथॉनचे हे सातवे सत्र आहे. डॉ.कराड हे त्यांच्या काळातील नवसंशोधक होते आणि त्यांनी संशोधनाला जास्तीत जास्त महत्त्व दिले पाहिजे यावर लक्ष्य केंद्रित केले. चार दशकांपूर्वी संशोधनाबाबतच्या दृष्टीकोनाचे आज फलित दिसून येत आहे. शैक्षणिक उत्कृष्टततेबरोबरच आता संशोधन,अभिनवता,स्टार्ट-अप संस्कृती विकसित झाली आहे. त्यांच्या दृष्टीकोनातील आणखी एक भाग म्हणजे शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी मूल्यांवर आधारित शिक्षण घेणे.या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी एमआयटी डब्ल्यूपीयू मधून पाच ते सहा स्टार्टअप निर्मिती व्हायला हवी असा आमचा उद्देश्य आहे.
हेही वाचा :