मुंबई : भारतातील आघाडीची फॅशन आणि तयार कपड्यांची कंपनी एबीएफआरएलने आज जाहीर केले की, डब्ल्यू (W), ऑरेलिया (Aurelia), विशफुल (Wishful), फोकसॉन्ग (Folksong) आणि इलेवन (Elleven) या अग्रगण्य कपड्यांचे ब्रॅंडस ज्या कंपनीच्या मालकीचे आहेत त्या टीसीएनएस क्लोदिंगला संपादन करण्याबाबतचा निश्चित करार एबीएफआरएलने टीसीएनएससोबत केला आहे. हा व्यवहार पुढीलप्रमाणे पार पडला जाईल:
१. एसपीए (SPA) आणि सशर्त सार्वजनिक खुल्या ऑफरद्वारे (कन्डिशनल ओपन ऑफर) संस्थापक प्रमोटर्सचे भागभांडवल मिळवणे
२. त्यानंतर दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण
टीसीएनएसच्या ५१% शेअरसाठी प्रमोटर स्टेक आणि खुली ऑफर रु. १६५० कोटी एवढी असून जो भारतीय फॅशन जगतातील सर्वात मोठा असा सौदा आहे.
या व्यवहाराविषयी बोलताना आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “हा करार भारतीय ग्राहक अर्थव्यवस्थेच्या उदारतेवर आणि गतीमानतेवर बिर्ला समूहाच्या विश्वासाचे आणखी एक प्रतीक आहे. आज भारत अनेक दशके टिकेल अशा उपभोगवादाच्या उंबरठ्यावर उभा असताना एबीएफआरएल आपल्या या रसरसणाऱ्या उत्साही देशाच्या फॅशन पटलाला आकार देण्यासाठी एक अग्रदूत आहे. एबीएफआरएलने टीसीएनएससोबत केलेला हा करार खरोखरच एक महत्वाचा टप्पा आहे, कारण तो संपूर्ण भारतीय फॅशन जगतातील अनोख्या आणि अपवादात्मक ब्रॅंड्सच्या आमच्या विद्यमान पोर्टफोलिओला पुरकच आहे.भारतीय महिलांच्या पारंपरिक कपड्यांच्या आवडत्या ब्रॅंड्सचा टीसीएनएसचा पोर्टफोलिओ स्वीकारून आम्ही वस्त्रोद्योगातील तयार कपड्यातील सर्वात मोठी श्रेणी असलेल्या पारंपरिक आणि एतत्देशीय (एथनिक) पोशाखांविषयी असलेली आमची बांधिलकी अजून मजबूत करीत आहोत. या संपादनाने वेगाने वाढणारा एबीएफआरएल प्लॅटफॉर्म परिवर्तनात्मक वाढीच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.”
या संपादनाबाबत बोलताना एबीएफआरएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशिष दीक्षित म्हणाले, “भारतीय संस्कृती आणि वारसा यांच्याभोवती विणलेल्या ओळखीमध्ये आज भारतीय तरूणांनी एक नवीन आत्मविश्वास शोधला असल्यामुळे या नंतरचे पुढचे आघाडीचे कन्झ्यूमर ब्रॅंडस भारतीय पारंपरिक पोषाखांच्या क्षेत्रातील असतील. टीसीएनएस त्याच्या डब्ल्यू (W), ऑरेलिया (Aurelia), विशफुल (Wishful), फोकसॉन्ग (Folksong) आणि इलेवन (Elleven) या अग्रगण्य कपड्यांचे ब्रॅंडसद्वारे सर्व प्रकारच्या बाजारपेठा व किंमतींच्या स्तरावर भारतीय महिलांच्या फॅशनच्या गरजा पूर्ण करत आहे. यापैकी प्रत्येक ब्रॅंड दीर्घ कालावधीमध्ये उभा राहिला असून त्यांना ग्राहकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. हा व्यवहार भारतातील पारंपरिक आणि एतत्देशीय पोशाखांचा सर्वात व्यापक पोर्टफोलिओ तयार करण्याच्या आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.”
गेल्या ५ वर्षांमध्ये एबीएफआरएलने धोरणात्मक आणि निर्धारित व निश्चयी कामांच्या मालिकांद्वारे आपला एक उत्तम असा पारंपरिक आणि एतत्देशीय पोशाखांचा (एथनिक) पोर्टफोलिओ निर्माण केला आहे. टीसीएनएसच्या या संपादनामुळे एबीएफआरएलचा पारंपरिक आणि एतत्देशीय पोशाखांचा पोर्टफोलिओपुढील तीन वर्षांत रु. ५००० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
टीसीएनएसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनंत डागा पुढे म्हणाले, “महिलांच्या पारंपरिक आणि एतत्देशीय (एथनिक) पोशाखांच्या बाजारपेठेत टीसीएनएस अग्रणी आहे. गेल्या २० वर्षांमध्ये आम्ही आमच्या आघाडीच्या ब्रॅंड्सच्या आधारे भारतातील सर्वात यशस्वी महिलांच्या पोषाखाची फ्रंचायझी तयार केली आहे. ही बाजारपेठ दीर्घकालीन वाढीच्या संधी देत आहे आणि एबीएफआरएलसोबतची आमची ही भागीदारी आम्हाला या संधीचा पूर्णपणे लाभ उठविण्यास मदत करेल. एबीएफआरएलची सिद्ध ब्रॅंड बिल्डिंग क्षमता, वितरण सामर्थ्य