‘एनएसयूआय’च्या अध्यक्षपदी भूषण रानभरे यांची फेरनिवड

93

पुणे : नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) पुणे शहर व जिल्हा अध्यक्षपदी भूषण रानभरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख यांनी रानभरे निवडीचे पत्र दिले.

‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन, राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अनुमतीने ही फेरनिवड निवड करण्यात आली असल्याचे आमिर शेख यांनी पत्रात म्हटले आहे.

भूषण रानभरे गेल्या अकरा वर्षांपासून संघटनेत सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या रानभरे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने उभारून ती यशस्वी केली आहेत. वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे पुणे महानगरपालिका निवडणूक लढवली होती.

भूषण रानभरे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, अशी माहिती ‘एनएसयुआय’च्या सोशल मिडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत हाळदेकर यांनी दिली आहे.