पुणे, १८ नोव्हेंबर, २०२२ : एडीपी इंडिया या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेसच्या आघाडीच्या पुरवठादार कंपनीने आज ‘ब्रिंग योर किड्स टू वर्क डे’ अर्थात मुलांना कामाच्या ठिकाणी आणण्याचा दिवस साजरा केला. हा मुळात वार्षिक असलेला उपक्रम, कोविड साथीमुळे पडलेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर, भव्यतेने, मजेने व प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. हैदराबादमधील कार्यालयात 800हून अधिक सहयोगी (कर्मचारी) आणि 1200 लहान मुलांनी, तर पुणे येथील कार्यालयात 350 सहयोगी व 500 मुलांनी साजरा केलेला हा उपक्रम खूपच यशस्वी ठरला. कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील कुटुंबाचे महत्त्व समजून घेण्याच्या उद्देशाने, एडीपी इंडियाच्या या वार्षिक उपक्रमात सहयोगी त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी होतात. संपूर्ण दिवसभर गंमतीशीर खेळ घेतले जातात, गेमिंगची सत्रे असतात आणि सर्वांसाठी रुचकर भोजनाचे आयोजन केले जाते.
एडीपी इंडिया भारतात 1999 मध्ये स्थापन करण्यात आली 23 वर्षांच्या काळात या कंपनीचे रूपांतर 10,500 सहयोगींच्या विशाल परिवारात झाले आहे. एडीपीमधील मुलांना कार्यालयात सोबत आणण्याच्या उपक्रमाची सर्व जण वाट बघत असतात आणि या कार्यक्रमाची तयारीही बरीच आधीपासून सुरू होते. यामुळे लहान मुलांना आपल्या आईवडिलांच्या कामाच्या ठिकाणाबद्दल जाणून घेण्याची, ते ज्यांच्यासोबत काम करतात त्यांना भेटण्याची, आईवडिलांच्या सहकाऱ्यांच्या मुलांना भेटण्याची संधी मिळते. एडीपीअर्ससाठी ही आपल्या कुटुंबांसोबत एकत्रितपणे आनंद लुटण्याची संधी ठरते. या साजरीकरणापूर्वी कार्यालयाची सजावट केली जाते, किड्स एरिया (लहान मुलांसाठी खेळण्याची जागा) तयार केला जातो, हवा भरलेले खेळातील पेन्स ठेवले जातात, जादूच्या प्रयोगांची तयारी केली जाते, लहान मुलांसाठी डीजे बोलावला जातो, सहयोगी व त्यांच्या कुटुंबियांसाठी टेकअवे लंच बॉक्सेस तयार केले जातात.
व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे कंपनीला समजते, व्यक्तीच्या कामात कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणूनच कुटुंबियांनी कामाचे ठिकाण बघणे, तेथील वातावरणाचा अनुभव घेणे हे व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्याचा मेळ साधण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे सहयोगींना अधिक चांगली कामगिरी करण्याचा व आपल्या कुटुंबियांना अभिमान वाटेल असे काही करण्याचा आत्मविश्वास मिळू शकतो.
सिनियर वाईस प्रेसिडेंट, HR हेड, ADP India डॉ. विपुल सिंह प्रचंड संख्येने जमलेल्या मुलांकडे बघून म्हणाले, “आमचे कर्मचारी व त्यांची मुले मौजमजेच्या उपक्रमांमध्ये भाग घेत आहेत हे बघताना आम्हाला मनापासून समाधान लाभते. कोविड साथीच्या काळात आम्ही या आनंदाला मुकत होतो; त्यामुळेच आम्हाला आमच्या गाभ्याच्या तत्त्वाचे महत्त्व उमगले- हे तत्त्व म्हणजे एकीतून प्रगती करणे आणि सांघिक विजय प्राप्त करणे होय. या आनंदाचे साक्षीदार होता आल्यामुळे आमच्या एडीपीयर कुटुंबाबात आम्हाला अधिक आत्मविश्वास वाटू लागला आहे. आम्ही एकीने उद्दिष्ट साध्य करू शकू आणि आमच्या कुटुंबांच्या पाठिंब्यासह आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहू शकू.”
कोविड साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबवावे लागलेले उपक्रम कंपनी पुन्हा सुरू करत आहे. हे उपक्रम कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात तसेच सांघिक भावना दृढ करण्यात खूपच उपयुक्त असतात. खेळण्याच्या जागा, पेण्टिंग झोन आणि सहयोगी व त्यांच्या कुटुंबियांसाठी टेकअवे स्नॅक्स अशा सकारात्मक गोष्टींसह या वार्षिक उपक्रमाची सांगता झाली.