एडलवाईस म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे !

50
Long term investment in Edelweiss Mutual Fund is always profitable!

पुणे : एडलवाईस म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे ! अंकित (गुंतवणूकदार; नाव बदलले आहे) हा एक उद्योजक आहे आणि त्याला, पर्सनल फायनान्स आणि गुंतवणुकीत विशेष रस आहे. त्याने पुस्तके वाचण्यात, बाजारातील कल जाणून घेण्यात आणि कंपन्यांचे विश्लेषण करण्यात बराच वेळ घालवला. यशस्वी होण्यासाठी स्मार्ट गुंतवणूक निर्णय घेणे आवश्यक आहे याची त्याला जाणीव होती. अंकितने पुण्यातील क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. चे भूषण वाणी या  म्युच्युअल फंड वितरकांची भेट घेतली. त्यांनी अंकितला त्याची विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन दोन म्युच्युअल फंड सुचवले. आपली दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंकितने आपण चांगल्या स्थितीत असल्याची खात्री केली.

भूषण यांनी अंकितला त्याच्या वारसाचा काही भाग एडलवाईस अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंडात गुंतवण्याची सूचना केली. इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणुकीद्वारे निश्चित मालमत्ता वाटपा सह दोन्ही मालमत्ता वर्गात व्यवहार करून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे फंडाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त,बाजारातील बदलत्या परिस्थितींचा फायदा घेण्यासाठी इक्विटी आणि कर्जामध्ये सक्रिय धोरण राबवतानाच जोखमीचा विचार करून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परताव्याची खात्री करण्यासाठी नियमित देखरेख आणि पुनर्संतुलन राखण्यात येते.

Long term investment in Edelweiss Mutual Fund is always profitable!

नंतरच्या वर्षांत अंकितने या फंडात केलेली गुंतवणूक हा एक स्मार्ट निर्णय ठरला. रोखसंग्रहाची एकूण जोखीम कमी करतांनाच या फंडाने सातत्यपूर्ण परतावा दिला. आपली गुंतवणूक फंडाच्या सक्षम आणि अनुभवी व्यवस्थापकांच्या हातात आहे हे जाणून अंकितला मनःशांती मिळाली.

एडलवाईस म्युच्युअल फंड दरवर्षी ३१ मार्च हा दिवस एडव्हाईस जरूरी है या नावाने आर्थिक सल्ला दिन म्हणून साजरा करतो. आर्थिक नियोजनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि एखाद्याचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक तज्ञांकडून सल्ला घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा दिवस विविध डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जातो, ज्याचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांच्या लक्ष्यावर आधारित गुंतवणूक, मालमत्ता वाटप आणि जोखीम व्यवस्थापन यासारख्या आर्थिक बाबींवर शिक्षित आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा दिवस महत्वपूर्ण आहे.