एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसने आणले ४,००० दशलक्ष  रुपयांचे सुरक्षित विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोखे सार्वजनिक विक्रीला

101

पुणे,  ३  जानेवारी, २०२३ : एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने  (“इएफएसएल ”) आज प्रत्येकी १,००० रुपये  दर्शनी मूल्याचे २,००० दशलक्ष रुपये  (“आधार  इश्यू”),  ४,०००  दशलक्ष रुपयांचे  (“टप्पा-१ इश्यू”) पर्यंत २,००० दशलक्ष रुपयांपर्यंत अतिभरण झाल्यास राखून ठेवण्याच्या पर्यायासह सुरक्षित विमोचनयोग्य अपरिवर्तनीय  रोखे (एनसीडी) विक्रीला आणण्याचे जाहीर केले आहे.

निश्चित कूपन असलेल्या आणि वार्षिक, मासिक आणि संचयी व्याज पर्यायासह २४ महिने, ३६महिने, ६० महिने आणि १२० महिने कालावधी असलेल्या या एनसीडीच्या दहा मालिका आहेत. एनसीडीसाठी प्रभावी वार्षिक मिळकत  ८.९९ % ते १०. ४६ %* पर्यंत आहे.

  • प्रतिवर्ष १०.४६ % पर्यंत प्रभावी मिळकत
  • पत मानांकन : “क्रिसिल एए -/नकारात्मक (नकारात्मक दृष्टीकोनसह क्रिसिलचे  दुहेरी  ए उणे मानांकन  म्हणून उच्चारले जाते)” आणि  “एक्यूइट एए – -/ नकारात्मक” (एक्यूइट दुहेरी ए उणे  म्हणून उच्चारले जाते)
  • केवळ डीमटेरियल स्वरूपात ट्रेडिंग
  • वाटप प्रमाणाच्या अधीन असलेल्या प्रत्येक भागामध्ये शेअर बाजाराच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये  प्रत्येक अर्ज अपलोड केल्याच्या तारखेवर  आधारित, म्हणजेच वाटप तारीख प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्त्वावर असेल.  

या रोखे विक्रीद्वारे  उभारलेल्या निधीपैकी किमान ७५ % रक्कम व्याजाची परतफेड/प्रीपेमेंट आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या मुद्दलासाठी वापरली जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. हा वापर  वेळोवेळी सुधारित केल्यानुसार (“सेबी  एनसीएस  विनियम”)  सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू आणि नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजची सूची) नियमावली, २०२१ चे पालन करून  रोखे विक्रीमध्ये उभारलेल्या निधीच्या २५ % पेक्षा जास्त नसावा.    

टप्पा १ रोखे विक्री मध्ये सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांना अतिरिक्त ०. २० %  प्रोत्साहन दिले जाईल, जे आमच्या कंपनीने यापूर्वी जारी केलेले एनसीडी /बॉंड/बॉंडचे धारक देखील आहेत आणि/किंवा आमची समूह कंपनी, ईसीएल  फायनान्स लिमिटेड, नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट प्रा. ली.,  एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एडलवाईस रिटेल फायनान्स लिमिटेड, आणि नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट प्रा. ली  आणि/किंवा ते कंपनीचे इक्विटी भागधारक(चे) यांना वाटपाच्या मानल्या गेलेल्या तारखेनुसार असेल. 

या टप्पा १ अंकांतर्गत जारी केले जाणारे रोखे   “क्रिसिल एए -/नकारात्मक  आणि “ एक्यूट एए -/नकारात्मक” पत  मानांकनानुसार आणण्यात येणार आहेत. 

 एक्वेरिस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या रोखे विक्रीची  इश्यूची लीड मॅनेजर आहे. टप्पा १  मंगळवार, ३ जानेवारी, २०२३ रोजी उघडेल आणि सोमवार, २३ जानेवारी, २०२३ रोजी लवकर बंद करण्याच्या पर्यायासह बंद होईल**. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी  हे रोखे मुंबई शेअर बाजारात  सूचीबद्ध केले जातील.