गिफ्ट सिटी, गांधीनगर; ऑगस्ट २०२३: एचडीएफसी बँक समूहातील दोन कंपन्या गिफ्ट सिटी- आयएफएससी मधून कामकाजाला सुरुवात करण्यासाठी तयार झाल्या आहेत.
एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री, आयएफएससी शाखा
- एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल* अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि जागतिक भारतीय डायस्पोरा यांच्यासाठी अमेरिकन डॉलर मध्ये जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा सादर करेल
- एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड फंड व्यवस्थापन आणि सल्ला सेवा सादर करेल आणि एचडीएफसी एएमसीज ऑफशोअर हब असे त्याचे स्थान असेल
भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने त्यांची आंतरराष्ट्रीय उपकंपनी एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री ची परदेशी शाखा आता एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल या ब्रँड नावाखाली गिफ्ट सिटी- आयएफएससी, इंडिया मधून अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) यूएस डॉलर मूल्यांकित जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा सादर करेल अशी घोषणा केली आहे.
एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल एनआरआय आणि जागतिक भारतीय डायस्पोरा (देशांतरीत जनसमूह) यांना सीमांनी मर्यादित नसलेल्या जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह विमा उपाय सुविधा सेवा सादर करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही उत्पादने अमेरिकन डॉलरसारख्या परकीय चलनाचा वापर करून खरेदी करता येऊ शकणार आहेत. एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनलने सादर केलेल्या सुविधांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये बचत, आरोग्य आणि सेवानिवृत्तीशी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे.
पहिले उत्पादन – “यूएस डॉलर ग्लोबल एज्युकेशन प्लॅन”, आता नावनोंदणीसाठी खुले आहे आणि पालकांना त्यांच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी भविष्यातील खर्च पूर्ण करण्यासाठी अमेरिकन डॉलर मूल्यांकित निधी तयार करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. गुंतवणुकीचे चलन आणि खर्चाचे चलन यांच्यातील भविष्यातील विसंगती दूर करणे हे या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री कंपनी जानेवारी २०१६ पासून कार्यरत असून ही एचडीएफसी लाइफची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी संयुक्त अरब अमिराती येथे दुबई मध्ये दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (“DIFC”) येथे स्थित आहे आणि दुबई वित्तीय सेवा प्राधिकरण (“DFSA”) द्वारे नियंत्रित केली जाते. गिफ्ट सिटी- आयएफएससी मधील परदेशी शाखेला गिफ्ट सिटी-आयएफएससी मधील युनिफाइड रेग्युलेटर, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (“IFSCA”) कडून आवश्यक मंजूरी आणि नोंदणीचे अनुदान मिळाले आहे. जागतिक भारतीय आणि अनिवासी भारतीयांच्या विमा गरजा काळजीपूर्वक तपासल्यानंतर खास अशा विशिष्ट ग्राहकांसाठी आणि नाविन्यपूर्ण परकीय चलन मूल्यांकित जीवन आणि आरोग्य विमा उत्पादने आणि उपाय तयार केले गेले आहेत. ही उत्पादने “एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल” ब्रँड खाली www.hdfclife-International.com या नव्याने सुरू झालेल्या वेबसाइटद्वारे उपलब्ध करून दिली जातील. दिशादर्शन करण्यास सोप्या आणि माहितीपूर्ण वेबसाइटवर पहिल्या उत्पादनाची झलक, व्यस्त पालकांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची योजना आखण्यासाठी मार्गदर्शक, सर्वसमावेशक शैक्षणिक कॅल्क्युलेटर, प्री-पॅक योजना, आगामी उत्पादन विभाग, अखंड सेवा पर्याय आणि नवीन योजनांसाठी जागा आरक्षित करण्याची तरतूद आहे. इतरांसह. पालकांना अर्थपूर्ण रीतीने दीर्घकालीन नियोजनास पाठबळ देणे हा यामागचा उद्देश आहे.
उत्पादने नावनोंदणीसाठी ऑनलाइन उपलब्ध असतील आणि ग्राहकांना कॉलवर आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या सहाय्याने सुरळीत सेवा अनुभवाचा लाभ घेता येईल. गिफ्ट सिटी मधून हे बहु-चलन जीवन आणि आरोग्य विमा उत्पादन आणि उपायसुविधा एचडीएफसी लाइफ द्वारे सादर केलेल्या आयएनआर उत्पादनांच्या विद्यमान संचाला पूरक ठरतील. अशा प्रकारे त्यांच्या सध्याच्या आणि नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध पर्यायांचा विस्तार होईल.
एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी)
एचडीएफसी एएमसीने त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) येथे स्थापना करण्याची घोषणा केली होती. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलेल्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी जागतिक स्तरावरील पोहोच विस्तारण्यासाठी आणि नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल आहे. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड ही गिफ्ट सिटी – आयएफएससी कडून गुंतवणूक व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रक्रिया करण्यासाठी आयएफएससीए मध्ये “फंड मॅनेजमेंट एंटिटी (रिटेल)” म्हणून नोंदणीकृत आहे.
प्रारंभिक उत्पादन रोलआउटचा एक भाग म्हणून एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडने ६ (सहा) फंड सादर करण्याचा