श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक मुखे असणार्या श्रीकृष्णाप्रमाणे ‘सनातन प्रभात’ ! – श्री. विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान
पुणे – सिंहाचा छावा असला, तरी त्याचे ध्येय हत्तीचे गंडस्थळ फोडणे हे असते. तसेच लहान असले, तरी ‘सनातन प्रभात’चे ध्येय महान आहे. सनातनचा हात धरा, मग कोणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक मुखे असणार्या श्रीकृष्णाप्रमाणे सनातन प्रभात आहे. श्रीकृष्णाचे जसे अलंकार आहेत, तसेच शस्त्रस्त्रेही आहेत. देशद्रोही उघडे करणे, धर्मद्रोह्यांना पळवून लावणे, सनदशीरपणे लोकचळवळ उभी करणे हे कार्य ही ‘सनातन प्रभात’ करते, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी केले. कोथरूड येथील अश्वमेध कार्यालयात १८ ऑगस्ट या दिवशी ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘सनातन प्रभात’च्या वतीने श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी उपस्थित होते. पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची या सोहळ्याला वंदनीय उपस्थिती लाभली. प्रारंभी प्रार्थना आणि श्लोक म्हणण्यात आले. वेदमूर्ती राजेंद्र आरेकर आणि रघुनाथ जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, विज्ञापन दाते मिळून 200 हून अधिक जणांची उपस्थिती लाभली. ‘सनातन प्रभात’च्या वतीने श्री. चैतन्य तागडे यांनी आपले विचार प्रकट केले. श्री. नागेश जोशी यांनी ‘’सनातन प्रभात’’ समाजाला कसे लाभदायी आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
हिंदुत्व विचारांचे नियतकालिक चालवणे, ही किती कठीण गोष्ट आहे, याची आपण कल्पना करू शकतो. हे शिवधनुष्य उचलण्याचे सर्वस्वी श्रेय जाते, ते सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहा’चे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ! वर्ष १९९८ मध्ये त्यांनीच ‘सनातन प्रभात’ची मुहूहूर्तमेढ रोवली. आज त्यांच्याच कृपाशीर्वादाने मराठी भाषेतील ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या, मराठी आणि कन्नड भाषांतील ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, तर इंग्रजी अन् हिंदी भाषांतील ‘पाक्षिक ‘सनातन प्रभात’, असा ‘‘सनातन प्रभात’’ नियतकालिकांचा विस्तार झाला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे स्वतः या नियतकालिक समूहाचे संपादक होते. एवढ्या उच्च कोटीचे संत एखाद्या नियतकालिक समूहाचे संपादक असणे, ही वृत्तपत्राच्या इतिहासातील एकमेव घटना असावी.
या वेळी ‘सनातन प्रभात’चे वाचक, वितरक यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. केतन पाटील यांनी केले. श्लोक म्हणून सोहळ्याची सांगता झाली.