नवी दिल्ली, १४ मार्च, २०२३: भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने आज त्यांच्या ग्राहक सेवा तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन करण्यासाठी सेल्सफोर्ससोबत काम करणार असल्याची घोषणा केली. सेल्सफोर्ससोबतच्या या कार्याद्वारे एअर इंडिया सर्व प्रमुख टच पॉइंट्सवर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष आणि हवेत देखील ग्राहकांचा अनुभव अगदी सुयोग्य करण्यात सक्षम होईल.
सेल्सफोर्ससोबत काम करून एअर इंडियाच्या सर्व प्रमुख टच पॉइंट्सवरील ग्राहकांना सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी यूनिफाईड डेटा प्लॅटफॉर्म आणि एआय-सहाय्यक साधनांसह प्रत्येक ग्राहक संवादामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम केले जाईल.
- एअरलाइनने एक सर्वसमावेशक व एकत्रित ग्राहक अनुभव देण्यासाठी आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स क्षमता अंतर्भूत असलेले सेल्सफोर्सच्या उत्पादनांचा स्वीकार केला आहे.
- सेल्सफोर्ससोबत काम करून ग्राहक अनुभव आणि ग्राहकाभिमुख कर्मचाऱ्यांची उच्च उत्पादकता यामध्ये मोठ्या सुधारणा आणण्याचे एअर इंडियाचे उद्दिष्ट आहे.
ग्राहक सेवेसाठी एक मजबूत आधार तयार करणे आणि अग्रगण्य नवकल्पनांद्वारे जागतिक दर्जाच्या आपलेपणाचे उबदार व त्याचबरोबर व्यावसायिक ग्राहक अनुभवाची रचना करणे हा विहान.एआय (Vihaan.AI) उपक्रमाचा प्रमुख भाग आहे जो एअरइंडियाने चालू केला आहे. एअरइंडियाची महत्वाकांक्षी विकास योजना पाहता त्यामुळे ग्राहकांच्या परस्परसंवादाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होईल आणि त्यासाठी आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानामधील नवीनतम समाविष्ट करणारे मजबूत आणि वाढीव तांत्रिक उपाय तैनात करणे अत्यावश्यक बनले आहे. सेल्सफोर्ससह एअरइंडियाचे भागीदारीतील कामामुळे हे साध्य करणे शक्य होईल.
“सर्व टचपॉइंट्सवर आमच्या ग्राहकांना आनंददायी अनुभव प्रदान करणे ही आम्हा प्रत्येक एयरइंडियन्सची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा सक्रियपणे समजून घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि त्यांची अत्यंत परिश्रमपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत तेव्हा आम्ही आमच्या ग्राहकांसमोरील आव्हानांना लौकरात लौकर विशेष प्राधान्याने सोडवू इच्छितो. वरील गोष्टी प्रभावीपणे पूर्ण करण्यास सक्षम करणारे स्केलेबल प्लॅटफॉर्म असणे आमच्या व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे. सिलिकॉन व्हॅलीतील एक आद्य व अग्रणी कंपनी सेल्सफोर्स सोबत काम करताना त्यांच्या आइन्स्टाईन आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स क्षमता आणि यूनिफाईड कस्टमर डेटा प्लॅटफॉर्मचा लाभ घेताना आम्हाला आनंद होत आहे, जेणेकरून आम्ही आमच्या ग्राहक सेवेला जागतिक स्तरावर उन्नत करू शकू,” असे एअरइंडियाचे मुख्य डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्य रामस्वामी म्हणाले.
सेल्सफोर्स इंडियाच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “आज कोणत्याही महत्वाकांक्षी संस्थेच्या व्यवसाय धोरणाच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान आहे. ती एक शक्ती आहे. पटींनी वाढ करणारी ताकद आहे, विकासासाठी आणि मूल्य वाढवण्यासाठी ते एक उत्प्रेरक आहे. एअरइंडियासाठी हे परिवर्तन म्हणजे एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आहे आणि अनेकांसाठी ते भावनिक देखील आहे. ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्कल्पना करून आणि उत्कृष्टता प्रदान करून एअरइंडियाच्या या प्रवासाचा एक भाग होणे हा आम्हाला आमचा सन्मान वाटतो.”
“एअरइंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचा व सर्वोत्कृष्ट अशा सर्व चॅनल्स चा अनुभव देण्याच्या आमच्या धोरणानुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्याशी जोडले जाणे सोपे करणाऱ्या विविध सेवा वैशिष्ट्यांचा परिचय करून देण्यासाठी सेल्स फोर्स सोबत काम करीत आहोत. आमचे संपर्क केंद्र ग्राहकाच्या प्रवासात प्रत्यक्ष उड्डाणाच्या आधी आणि उड्डाणानंतर दोन्ही वेळी महत्त्वाची भूमिका बजावते. आमच्या संपर्क केंद्रांमध्ये आणि इतर चॅनल्समध्ये सेल्सफोर्सचा सहभाग आणणे हे अनेक टच पॉईंट्सवर अखंड संदर्भित आणि वैयक्तिकृत ग्राहक अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नातील एक पाऊल आहे,” असे एअरइंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव आणि ग्राउंड हॅंडलिंग अधिकारी श्री. राजेश डोग्रा म्हणाले.
सेल्सफोर्सकडून उपयोजित केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे एअरइंडियाला त्यांच्या सर्व संपर्क केंद्रांवर, मोबाइल, वेब, चॅटबॉट, इ-मेल, सोशल मिडिया आणि इतर चॅनल्स वर देखील ग्राहकांसोबतच्या परस्परसंवादाचा मागोवा घेता येईल, जेणेकरून ग्राहकांच्या प्रश्नांची तसेच समस्यांची वेगवेगळ्या चॅनल्स वरील माहिती एकाच ठिकाणी मिळेल (सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ). यामुळे एअरइंडियाच्या ग्राहकांना सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या स्वयंचलित प्रणालींना आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे सहाय्य करून आव्हानांवर सक्रियपणे काम करून ते पूर्ण सोडविण्याची क्षमता देखील मिळेल. हे तंत्रज्ञान आणल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एअरइंडियाला त्याच्या ग्राहकांना सखोलपणे समजून घेण्यासाठी एकाच एकीकृत ग्राहक डेटा प्लॅटफॉर्ममध्ये ग्राहकांचा अगदी ३६० डिग्री व्युह म्हणजे संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. ही माहिती नंतर सर्व प्रमुख टच पॉइंट्सवर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष आणि हवेत देखील ग्राहकांचा परस्पर संवाद समृद्ध करण्यासाठी उपयोगात आणली जाईल.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.airindia.in
हेही वाचा :