एअर इंडियाचा संपूर्ण नेटवर्कमध्ये खास ९६ तासांचा सेल चालू

21
Air India partners with technology industry leader Salesforce to deliver a delightful customer experience

गुरुग्राम, १७ ऑगस्ट, २०२३: भारतातील आघाडीची जागतिक वाहक कंपनी, एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना त्यांच्या आगामी सहलींची योजना अतिशय आकर्षक भाड्यामध्ये करण्याची संधी देत सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांच्या नेटवर्कमध्ये एक विशेष ९६ तासांचा सेल चालू केला आहे.

  • एअर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपवर केलेल्या सेलमधील बुकिंगसाठी शून्य सुविधा शुल्क
  • फ्लाईंग रिटर्न्स सदस्य दुप्पट लॉयल्टी बोनस पॉईंट्स मिळवू शकतात  

देशांतर्गत मार्गांवर इकॉनॉमी वर्गाचे सर्व समाविष्ट असलेले एक वेळचे भाडे (ऑल इंक्लूसिव वन-वे फेअर) भारतीय रु.१४७० फक्त पासून चालू होतील आणि बिझनेस वर्गाचे सर्व समाविष्ट असलेले एक वेळचे भाडे (ऑल इंक्लूसिव वन-वे फेअर) भारतीय रु.१०,१३० फक्त पासून चालू होतील. अशाच प्रकारचे आकर्षक भाडे निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी देखील उपलब्ध आहेत.

एअर इंडियाचे संकेतस्थळ (airindia.com) आणि मोबाइल अॅपवरुन सेल मध्ये केलेल्या सर्व प्रकारच्या बुकिंगवर कोणतेही सुविधा शुल्क लागणार नाही. एअर इंडियाचे फ्लाईंग रिटर्न्स सदस्य दुप्पट लॉयल्टी बोनस पॉईंट्स मिळवू शकतात.

Air India direct from Ahmedabad to London Gatwick Air service was inaugurated

निवडक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर ०१ सप्टेंबर.२०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या प्रवासासाठी असलेल्या या एअर इंडियाच्या विशेष सेलमध्ये बुकिंग आजपासून सुरू झाले आहे आणि ते २० ऑगस्ट २०२३ रोजी रात्री २३:५९ वाजता बंद होईल. ब्लॅकआउट तारखा प्रवास कालावधीपासून लागू होतात.

एअर इंडियाचे संकेतस्थळ (airindia.com) आणि मोबाइल अॅप व्यतिरिक्त, या सेलच्या अंतर्गत बुकिंग अधिकृत ट्रॅव्हल एजंट्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स यांच्या मार्फत देखील, थेट चॅनेल बुकिंग्सशी संबंधित जे विशेष लाभ आहेत त्यांच्या शिवाय, करता येईल. या सेलमधील विक्रीवरील जागा मर्यादित आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्या उपलब्ध आहेत.