एंजल वनची ग्राहकसंख्या १२.१९ दशलक्षांवर पोहोचली

60

मुंबई, ७ डिसेंबर २०२२: फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने आपल्या ग्राहक संख्येमध्ये वार्षिक ६६.५ टक्क्यांची वाढ केली, जेथे नोव्हेंबर’२२ मध्ये ०.३२ दशलक्ष एकूण ग्राहक संपादनासह ग्राहकांची संख्या १२.१९ दशलक्षपर्यंत पोहोचली. एंजल वनने वार्षिक २३.८ टक्क्यांच्या वाढीची नोंदणी करत ७०.८२ दशलक्ष ऑर्डर्ससह प्रबळ व्यवसाय वाढ देखील केली.

कंपनीची सरासरी दैनिक उलाढाल १२.९७ ट्रिलियन रूपयांपर्यंत वाढली, ज्यामध्ये वार्षिक ७९.७ टक्क्यांची वाढ झाली. एकूण रिटेल इक्विटी उलाढालीमधील कंपनीचा मार्केट शेअर वार्षिक ४ बीपीएस वाढीसह २१.१ टक्क्यांनी वाढला. एंजल वनचे नोव्हेंबर’२२ साठी सरासरी क्लाएंट फंडिंग बुक १२.९२ बिलियन रूपये होते.

एंजल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “एकंदरीत वाढती ग्राहक संख्या आणि वाढत्या ऑर्डर्समुळे आमची कामगिरी प्रबळ राहिली आहे. यामधून निदर्शनास येते की, आम्ही लोकांमध्ये आर्थिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता पसरवण्याच्या दिशेने योग्यरित्या वाटचाल करत आहोत. एंजन वनमध्ये आम्ही सर्व वयोगटातील व भौगोलिक क्षेत्रांमधील लोकांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवले आहे.’’

एंजल वन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहक वर्गामध्ये वाढ करत आहोत आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून ग्राहकांना व्यापून घेत आहोत. आम्ही प्रबळ व्यवसाय कामगिरीचे श्रेय आमच्या तंत्रज्ञान-सक्षम धोरणाला देतो, जे आम्हाला देशाच्या सखोल भागापर्यंत पोहोचण्यास सक्षम करत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणूक प्रवासादरम्यान सुलभ व एकसंधी उत्पादन देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आम्हाला भारतीय भांडवल बाजारपेठांच्या विकासाप्रती योगदान देता येते.’’