पुणे : तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने ‘ख्याल विमर्श’च या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र आयोजिले आहे.
शनिवार, दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.
‘ख्याल संगीत’ किंवा ‘ख्याल गायकी’ ही संगीतकाराला त्याची वेगळी शैली निर्माण करण्याची संधी देते. ख्याल संगीत मुक्त स्वरूपाचे व वैविध्यपूर्ण आहे.
याच ख्याल संगीताचा उलगडा प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे ‘ख्याल विमर्श’च्या दुसऱ्या सत्रात करणार आहेत.
यावेळी त्यांचे बहारदार गायन ऐकण्याचीही संधी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.