उबरने भारतातील आणखी सहा शहरांमध्ये केला ‘रिझर्व्ह’चा विस्तार, नियोजित प्रवास करणाऱ्यांसाठी रोख पेमेंट पर्यायही खुला

72

भारत : उबरने भारतातील आणखी सहा शहरांमध्ये केला ‘रिझर्व्ह’चा विस्तार, नियोजित प्रवास करणाऱ्यांसाठी रोख पेमेंट पर्यायही खुला रायडर्सना ३० मिनिटांपासून ते ९० दिवसांपर्यंत त्यांच्या राइड्सचे प्री-बुकिंग करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत उबरने आज भारतातील आणखी ६ शहरांमध्ये रिझर्व्हचा विस्तार करण्याची घोषणा केली. विश्वसनीय, आगाऊ नोंदणी केलेल्या राइड्ससह उबर रिझर्व्ह आता रायडर्सना कॅश पेमेंटसाठी उपलब्ध असेल. ही सेवा आता मुंबई, बंगलोर, दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोची, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ आणि गुवाहाटी या भारतातील १३ शहरांमध्ये सुरू आहे.

बाजारपेठेतील गरजांना अनुकूल अशा नवनवीन जागतिक योजना सादर करत रिझर्व्ह सेवेचा विस्तार उबरची भारताप्रती असलेली बांधिलकी दर्शवितो. ऑन-डिमांड ट्रिपच्या जोडीला रिझर्व्ह पर्यायासह, ड्रायव्हर्स त्यांच्या रस्त्यावरील वेळेसाठी सर्वात योग्य असलेल्या ऑफरमधून निवड करू शकतात. उबर रिझर्व्ह ड्रायव्हर्सना त्यांची मिळकत आणि ड्रायव्हिंग वेळापत्रक अगोदर निश्चित करण्यात मदत करण्यासाठी ७ दिवस अगोदर पर्यंत ट्रिप स्वीकारण्याचा अतिरिक्त पर्याय पुरविते.

 रिझर्व्ह आता उबर अॅपच्या नवीन आवृत्तीमध्ये एक नवीन पर्याय म्हणून दिसत आहे आणि उबर प्रीमियर, उबर इंटरसिटी, उबर रेंटल्स आणि उबर एक्सएल वर उपलब्ध आहे. नवीन उत्पादन पूर्वनियोजित प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले असून त्यात कामाच्या सहली, विमानतळावर सोडणे, डॉक्टरांच्या भेटी आणि इतर नियोजित भेटींचा समावेश आहे. नियोजित राइड पर्याय विविध उत्पादन श्रेणींमध्ये आकर्षक किंमतींवर उपलब्ध असतील.

 या नवीन योजनेच्या सादरीकरणाबद्दल बोलताना उबरचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले, “उबर रिझर्व्हचा भारतातील आणखी शहरांमध्ये विस्तार करण्यास आम्ही उत्सुक आहोत. रिझर्व्हमुळे रायडर्स राइड्सची प्री-बुकिंग करू शकतात आणि त्यायोगे मन:शांती, निश्चितता आणि त्यांच्या ट्रीपवर अतिरिक्त नियंत्रण सुनिश्चित करू शकतात. रिझर्व्हमुळे ड्रायव्हर्सना ऑन डिमांड आणि प्री-बुक केलेल्या ट्रिपमधून निवडण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतात. रायडर्स, ड्रायव्हर्स आणि शहरे सगळ्यांसाठीच योग्यपणे कार्यरत राहील अशा प्रकारे आम्ही उबरमध्ये नेहमी गतिशीलतेची पुनर्कल्पना करत असतो. जेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा रिझर्व्हसह आम्ही आणखी निश्चितता खुली करत आहोत.”

 सर्वसमावेशक सुरक्षा उपायांसह, सोयीस्कर पिक-अप, किफायतशीर किमती आणि एका बटणाच्या क्लिक वर डिजिटल पेमेंट पर्यायांसह, रायडर्स आणि ड्रायव्हर त्यांच्या इतर लोकप्रिय उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील अशा नवीन श्रेणीमध्ये एक अखंड, विनाअडथळा उत्पादन अनुभव सादर करण्याची उबरला आशा आहे.