उपसरपंच नरेंद्र गोटेकर यांच्या जन्मदिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

126

संगमेश्वर : प्रतिनिधी, सरंद येथील गावचे उपसरपंच नरेंद्र गोटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरंद नं.१ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

नरेंद्र गोटेकर हे सरंद गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना काही ना काही सामाजिक उपक्रम करण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या गावातील लोकांसाठी खास करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना मदत करण्यासाठी गोटेकर नेहमीच प्रयत्नशील असतात.

याच हेतूने आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचे ठरवले. त्यांच्या या उपक्रमाला शाळेतील शिक्षकांनीही सहमती दर्शविली.

शालेय शिक्षकांच्या सहकार्याने गोटेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च न करता गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपत नरेंद्र गोटेकर यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.