उद्योजकांना आता काळानुसार बदलावे लागेल : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

22
Entrepreneurs now have to change with the times: Dr. Masalaking. Dhananjay Datar

पुणे  : सध्याची तरुण पिढी डिजीटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करु लागली आहे. नवी सॉफ्टवेअर, ॲप्स वापरण्याचे प्रमाण तसेच लॅपटॉप व मोबाईलवरुन व्यवहार वाढले आहेत. रस्त्यावरील फेरीवाले आणि छोट्या विक्रेत्यांकडेही आता डिजीटल पेमेंटची सोय उपलब्ध आहे.

  •         आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा धनंजय दातार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
  •         डॉ. दातार व अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते ५० हून अधिक गुणवंतांना पुरस्कार

विपणन व प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. आजचा ग्राहकवर्ग अधिक जागरुक व ऑनलाईन इत्थंभूत माहिती घेऊन मगच उत्पादने खरेदी करतो.

उद्योजकांना आता काळानुसार बदलावे लागेल व व्यवसायात नवी तंत्रे, नवे प्रवाह व नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी डोंबिवली येथे केले.

हेही वाचा : BIG BREAKING : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?