‘उडचलो’ (udChalo) एआयटीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे करियर मार्गी लावण्यास मदत करते

99
'udChalo' helps AIT students in their career path by providing scholarships
udChalo

पुणे, फेब्रुवारी ०८,२०२३: एक आघाडीची कन्स्यूमर टेक स्टार्ट अप कंपनी ‘उडचलो’ (udChalo) ने, जी खासकरून केवळ भारताच्या संरक्षण दलांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना सेवा देते,  १ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्मी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) मधील ३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली. जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हिएसएम, एडीएस, सीओएएस हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. सशक्त राष्ट्र निर्मितीच्या भूमिकेला अजून वाढविण्याच्या उद्देशाने ‘उडचलो’ (udChalo) पात्र विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करत आहे.

udchalo

‘उडचलो’ (udChalo) आर्मी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) मधील ३२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सहाय्य करते, भारताच्या भविष्याला आकार देणारा  एक उपक्रम

‘उडचलो’ (udChalo) ने २०१८ पासून पुण्यातील इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) सोबत भागीदारी केली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दरवर्षी ३२ हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी दिली जाते. ही शिष्यवृत्ती या पात्र विद्यार्थ्यांच्या मदतीला येते. ‘उडचलो’ (udChalo) इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) च्या प्रशासनासोबत मिळून या शिष्यवृत्तीसाठी योग्य असलेल्या विद्यार्थ्यांना शोधते. एआयटी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच आपल्या देशासाठी एक मजबूत संरक्षण कवच बनण्यास, एक ज्येष्ठ अनुभवी सैनिक आणि त्याही पुढे जाण्यास प्रोत्साहित करते.

‘उडचलो’ (udChalo) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी कुमार म्हणाले, आमची एआयटी सारखी महाविद्यालये लष्करातील सर्वोत्तम कर्मचारी विकसित करणारे एक उत्तम साधन म्हणून काम करतात आणि विद्यार्थ्यांना उपाय केंद्रित विश्लेषणात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव प्रदान करतात. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना भविष्यात देशासाठी मजबूत संरक्षण कवचासह मानवतेची मूलभूत मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते.

सैनिकांचे जीवन सोपे करणे’ या आपल्या ब्रीद वाक्याशी वचनबद्ध असलेल्या ‘उडचलो’ (udChalo) ची एआयटी शिष्यवृत्ती ही कंपनी ने भारतीय लष्कर दलांना दिलेल्या समर्थनाचा आणि सहकार्याचा पुरावा आहे. याशिवाय,  ‘उडचलो’ (udChalo) ने नुकतेच सीड स्पार्क (Seed Spark) च्या पाच महिन्याच्या ऑनलाइन उद्योजकता कार्यक्रमाशी करार केला आहे.

या उपक्रमामुळे ‘उडचलो’ (udChalo) जवानांच्या कारकि‍र्दीच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात ही त्यांच्या जीवनासाठी महत्त्वाचे काम करीत आहे.

हेही वाचा : 

शेफलर इंडिया लिमिटेडने श्रीमती सुमिताश्री इरंती यांना आपल्या संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले