पुणे जून २४, २०२३: ई.एफ.सी (आय) लिमिटेड, एकात्मिक सेवा पुरविणारे कार्यालय (इंटिग्रेटेड सर्व्हिस्ड ऑफिस) / को-वर्किंग स्पेस ऑपरेटर कंपनीने मार्च २०२४ पर्यंत आपली क्षमता २३,००० जागांवरून ६०,००० जागांपर्यंत तिप्पट करण्याची योजना आखलेली आहे. मजबूत संस्थात्मक मागणीमुळे कंपनी आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत १०,००० जागा वाढविणार आहे. कंपनीने बिल लावलेल्या जागांपैकी ६५% जागा संस्थात्मक विभागासाठी आहेत, तर उर्वरित ३५% जागेत किरकोळ विभाग आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण रु. १४४.५८ कोटींचा महसूल आणि रु. २४.०५ कोटींचा निव्वळ नफा नोंदविला आहे. एबिटडा रु. ३९.२३ कोटी आणि एबिटडा मार्जिन २७.१ टक्के होते. तर ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मार्जिन १६.६ टक्के होते.
योजनांविषयी बोलताना उमेश सहाय, संस्थापक आणि सी.ई.ओ, ई.एफ.सी (आय) लिमिटेड, म्हणाले की, ” ई.एफ.सी इंडियामध्ये, आम्ही एक परिसंस्था तयार केली आहे ज्यात आम्ही कार्यक्षम, सुरक्षित, चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले आणि कार्याभ्यासासाठी (एर्गोनॉमिक्स)-अनुकूल कार्यस्थानांचा समावेश असलेल्या मागणीनुसार निर्मित (मेड-टू-ऑर्डर) कार्यालयांपासून को-वर्किंग उपायांचा समावेश आहे. आमचे मजबूत ग्राहक संबंध, क्षेत्रात असलेले कौशल्य, प्रमुख प्रतिभा, एकात्मिक प्रस्तुती देऊ करणे आणि मजबूत ताळेबंद यांच्यावर आमच्या विस्तार योजनेचा आधार अवलंबून आहे. गेल्या सहा वर्षांत आम्ही २३,००० जागांचा टप्पा गाठला होता आणि तो या वर्षभरात तिप्पट होऊन ६०,००० च्या आसपास जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. असे करताना आमचा नफा अबाधित ठेवण्याचे आम्ही उद्देश ठेवलेले आहे.
ई.एफ.सी चे मुख्यालय पुण्यात आहे आणि तिची सात राज्यांमध्ये उपस्थिती असून एकूण १.५ मिलियनहून अधिक चौरस फूट क्षेत्रफळावर असलेली ३५+ केंद्रे आहेत.