पुणे, डिसेंबर ०७ , २०२२ : ईटन या ऊर्जा व्यवस्थापन कंपनीतर्फे त्यांच्या ईनोव्हेशन 3.0 या फ्लॅगशिप इव्हेंटचे यश साजरे करण्यात आले. अशा प्रकारच्या या एकमेव कार्यक्रमाचे नाव ईटन आणि इनोव्हेशन या नावांची संधी करून तयार करण्यात आले आहे. ईटनच्या ग्लोबल सप्लाय चेन सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे (जीएससीसीओई) त्यांच्या पुण्यातील कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ईटनच्या कर्मचाऱ्यांचे सबलीकरण करणे, उदयोन्मुख डिजिटलायझेशन स्टार्ट-अप्ससोबत नवकल्पनांची देवाणघेवाण करणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून गुणवंतांचा शोध घेणे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ व्याख्यात्यांकडून शिकणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी जीएससी सीओईतर्फे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते : कर्मचाऱ्यांसाठी हॅकेथॉन, कॉलेज कनेक्ट्स, स्टार्ट-अप्स, फंक्शनल कनेक्ट्स, आयडियाथॉन, भागधारकांच्या भेटी आणि प्रश्नमंजुषा अशा कार्यक्रमांची रेलचेल होती. पुरवठा साखळीशी संबंधित जागतिक पातळीवरील व्यावसायिक समस्या निश्चित करण्यात आल्या आणि जीएससी सीओईच्या 650+ कर्मचाऱ्यांना त्या समस्या सोडविण्याचे आव्हान देण्यात आले. सीएसआयआरचे (कौन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च) महासंचालक रघुनाथ माशेलकर यांचे डि-टॉक्स हे सत्र या कार्यक्रमाचे अजून एक ठळक वैशिष्ट्य होते.
ईटनच्या ग्लोबल सप्लाय चेन सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक उमाकांत नायर म्हणाले, “आमच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि सप्लाय चेन रेझिलिअन्सच्या (आव्हानांवर मात करण्याच्या) प्रवासात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी वैविध्यपूर्ण कौशल्ये आणि नवकल्पना ही गुरुकिल्ली आहे. ईनोव्हेशन 3.0 हा अत्यंत खिळवून ठेवणारा, सहयोगभावनापूर्ण आणि करमणूकप्रधान इव्हेंट असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे इनोव्हेशन व त्यांच्या ध्येयसिद्धी यांचा सन्मान करण्याचा आमचा मानस असतो, जेणेकरून ईटनमध्ये त्यांचा अनुभव अधिक संस्मरणीय ठरू सकेल. नवकल्पना + स्टँडर्डायझेशन + कर्मचारी संवाद हे आमच्या यशाचे गमक आहे.”
‘कॉलेज कनेक्ट’ स्पर्धेअंतर्गत व्हीआयटी, व्हीआयआयटी, एमआयटी, सीओईपी या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांना डेटा सायन्सचा वापर करून समस्या सोडविण्याचे आव्हान देण्यात आले होते. स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या सात टीम आणि वरील महाविद्यालयांमधील 17 विद्यार्थ्यांना ईटनच्या ऑफिसमध्ये निमंत्रित करण्यात आले होते.