इन्फ्रा.मार्केटने पुण्यात एएसी ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लाँच केला

126

पुणे, ७ फेब्रुवारी २०२३: इन्फ्रा.मार्केटने पुण्यात एएसी ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लाँच केला. बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालवणाऱ्या इन्फ्रा.मार्केट पुण्यातील तळेगाव आणि सांगलीतील शिराळा येथे ग्रेड १ दर्जाचे एएसी ब्लॉक प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तम दर्जाचे एएसी ब्लॉक्स तयार करण्यासाठी या कारखान्यांमध्ये अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन उपकरणांचा वापर केला जाईल, जे उद्योगातील सर्वात टिकाऊ आणि किफायतशीर बांधकाम साहित्यांपैकी एक बनले आहेत.


Infra.Market Launches AAC Block Manufacturing Plant in Pune

एएसी ब्लॉक प्लांट्स शहराच्या मध्यभागी आणि पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण प्रदेशाच्या आसपासच्या भागात सहज उपलब्ध व्हावेत यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहेत. तळेगाव आणि शिराळा प्लांटची उत्पादन क्षमता अनुक्रमे २० हजार घन ब्लॉक मीटर व ११ हजार घन ब्लॉक मीटर प्रति महिना आहे. इन्फ्रा.मार्केट विपुल प्रमाणात असलेली मागणी याद्वारे पूर्ण होते. ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने संपूर्ण भारतामध्ये आपल्या कार्याचा विस्तार करण्याची आणि सर्व आकाराच्या एएसी ब्लॉक्सची निर्मिती करण्याची योजना आखली आहे. नवीन क्षमतांमुळे रोजगाराच्या संधीदेखील निर्माण होतील ज्याचा फायदा जवळपासच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना करता येईल.

एएसी ब्लॉक प्लांटच्या लॉन्च मधे इन्फ्रा.मार्केट सह-संस्थापक आदित्य शारदा म्हणाले, तळेगाव आणि शिराळा येथे आमच्या सर्वात मोठ्या ग्रेड १ एएसी ब्लॉक सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. हा लाँच आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धि आहे. आम्हाला खात्री आहे की आमचे कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स हे सुनिश्चित करतील, आणि आमच्या ग्राहकांना वेळेवर उत्कृष्ट दर्जाचे साहित्य मिळेल. नजीकच्या भविष्यात, आम्ही भारतातील अधिक शहरांमध्ये सेवा देण्यासाठी आमच्या ऑपरेशन्सचा विस्तार करू, अशी आशा व्यक्त करतो.

कंपनीचा प्रतिभाशाली विशेषज्ञ ग्राहकांना त्यांचे सर्वाधिक उत्पादने पुरवून उत्पादकता वाढवू शकतील व याची खात्री करण्यासाठी त्यांना सतत सहकार्य आणि तांत्रिक-व्यावसायिक सहाय्य प्रदान करतील. इन्फ्रा.मार्केट कडे डिस्पॅच आणि ट्रॅकिंगमधीले कौशल्यदेखील आहे. ते सुनिश्चित करते की, ऑर्डर प्रत्येक वेळी वेळेवर पूर्ण होणार. इन्फ्रा.मार्केट ची टीम एक समर्पित चमूदेखील आहे, जे विक्री-पश्चात सेवा प्रदान करेल.