पुणे, जुलै २०२३ : इन्फ्रा.मार्केटने इवास या आपल्या ब्रॅण्डसाठी प्रसिध्द अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. तिच्या सौंदर्याची मोहिनी आणि विश्वासू व्यक्तिमत्व या जोरावर जेनेलिया या ब्रॅण्डमध्ये तजेलदारपणा निर्माण करेल, ज्यायोगे होम इंटेरिअरला चमचमत्या स्वप्नांची जोड मिळेल.तिचे दिलखेचक व्यक्तिमत्व आणि तरुण पिढीतील तिच्या उदंड लोकप्रियतेमुळे आयवासचे क्षितीज आणखी विस्तारेल आणि त्याचबरोबर आधुनिकतचे भान राखणाऱ्या ग्राहकरुपी प्रेक्षकांशी ब्रॅण्डेचे नाते उत्तरोत्तर जुळेल.
इन्फ्रा.मार्केटचे सहसंस्थापक आदित्य शारदा याप्रसंगी म्हणाले की, कार्यक्षमता आणि सौदर्य यांचा मिलाफ घडविणारे नाविन्यपुर्ण प्रकार सादर करत इवास च्या माध्यमातून आम्ही होम इंटेरिअरच्या विश्वात एक नवीन क्रांती आणत आहोत. कार्यक्षमता आणि सौंदर्य यांचा मिलाफ घडविणारे नाविन्यपुर्ण प्रकार सादर करत आहोत. जेनेलिया देशमुखसारख्या प्रतिभावान भारतीय अभिनेत्रीशी नाते जुळवताना आम्हाला अतिशय आनद होत आहे. तिचे दैदिप्यान यश आणि भूरळ घालणारे व्यक्तिमत्व हे आमच्या ब्रॅण्डसाठी अतिशय साजेसे आहे. इवास ब्रॅण्डचे अस्तित्व आणखी भव्यदिव्य करत आमच्या ग्राहकांशी बळकट संबंध निर्माण करण्यावर आम्ही भर देत आहोत.
जेनेलिया देशमुख ग्राहकांच्या आकांक्षांशी सुसंगत असलेली उत्कृष्टता आणि भव्यता प्रदान करण्याच्या तिच्या अतूट वचनबद्धतेला मूर्त रूप देत ब्रँडची ओळख आणखी समृद्ध करेल.
या नवीन जबाबदारीबद्दल आपल्या भावना प्रकट करताना भारतीय अभिनेत्री जेनेलिया देशमुख म्हणाली की, घर हे एक अनोखे व्यक्तिमत्व आणि शैली प्रतिबिंबित करणारे एक खास विश्व आहे. तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी, आकांशा याद्वारे घराच्या अंतर्भागात क्रांती घडवून आणण्याच्या इवासच्या भविष्यवादी दृष्टिकोनाशी माझाही दृष्टीकोन तंतोतत जुळतो. मी इंफ्रा डॉट मार्केट परिवारात सामील होताना रोमांचित झालेली आहे आणि स्वप्नातील घरे ग्राहकांच्या आयुष्यात खरोखर साकारण्याच्या त्यांच्या स्वप्नांची आतुरतेने वाट पाहत आहे.
इन्फ्रा.मार्केटद्वारे समर्थित इवास हा संस्कृत शब्द निवास वरून आलेला आहे आणि घराच्या नूतनी करणाला तो प्रेरणा देतो. पंखे, लाइट्स, टाइल्स, सॅनिटरीवेअर, बाथ फिटिंग्ज, डिझायनर हार्डवेअर आणि अगदी मॉड्युलर किचन आणि वॉर्डरोब्समधील प्रीमियर प्रकार एकत्र आणून एकप्रकारे तो घर बांधण्याचा भावनिक प्रवासच साजरा करतो. गृह परिवर्तनाच्या या प्रवासात घराला नवीन उंची प्रदान करण्यासाठी आणि सौंदर्याची जोड देण्यासाठी आयवास कटिबद्ध आहे आणि त्यामुळे घर सोयींनी युक्त आणि आनंददायीसुद्दा बनते.