आव्‍हान देणे कधीच थांबवू नका : ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू एस १००० आरआर लॉन्‍च

92
पुणे, ११ डिसेंबर २०२२ : बीएमडब्ल्यू मोटोर्राडची अत्‍यंत लोकप्रिय सुपर स्‍पोर्ट बाइकची ऑल-न्‍यू व्‍हर्जन – बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर आज भारतात लॉन्‍च करण्‍यात आली आहे. कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट म्‍हणून लॉन्‍च करण्‍यात आलेली ही बाइक भारतातील  बीएमडब्ल्यू   मोटोर्राड डीलर नेटवर्कमध्‍ये उपलब्‍ध आहे. डिलिव्‍हरींना फेब्रुवारी 2023 पासून सुरूवात होईल.
प्रबळ स्‍पर्धात्‍मक विभागामध्‍ये आरआर बेंचमार्क असण्‍यासोबत स्‍पीडचा रोमांच घेण्‍याची आवड असलेल्‍या रेसिंग उत्‍साहींमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय आहे. 2009 मध्‍ये ही बाइक लॉन्‍च केल्‍यापासून प्रत्‍येक जनरेशनने राइडच्‍या नियमांना पुनर्परिभाषित केले आहे आणि हीच परंपरा नवीन आरआर सह कायम आहे.
ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर ने इंजिन, सस्‍पेंशन, चेसिस, ऐरोडायनॅमिक्स, डिझाइन आणि असिस्‍टन्‍स सिस्टिम्‍समधील सर्वसमावेशक अपडेट्समुळे तिच्‍या अग्रगण्‍य बाइक्‍सना मागे टाकले आहे. विविध भागांमधील इंजीनिअरिंग सुधारणांमुळे या बाइकचे सर्वोत्तम व्‍हर्जन दिसून येते.
या लॉन्‍चबाबत बोलताना   बीएमडब्ल्यू   ग्रुप इंडियाचे प्रेसिडण्‍ट श्री. विक्रम पावाह म्‍हणाले, ‘’एस 1000 आरआर अस्‍सल   बीएमडब्ल्यू   मोटोर्राड रेसिंग डीएनएला सादर करते. रेसट्रॅकवर किंवा रोडवर  आरआर   कधीच दुसऱ्या स्‍थानावर नसते, तर नेहमीच अग्रस्‍थानी असते.  आरआर   राइडर्सना परफॉर्मन्‍सचे अॅड्रेनालाइन आवडते आणि ते स्‍वत:ला मर्यादेपलीकडे घेऊन जातात. अधिक इंजिन पॉवर, शार्पर डिझाइन, सुधारित ऐरोडायनॅमिक्‍स आणि हँडलिंग डायनॅमिक्‍समधील अनेक नवोन्‍मेष्‍कारांनी सुसज्‍ज ऑल-न्‍यू एस 1000 आरआर   नवीन व्हर्जनमध्‍ये अधिक पुढे जाण्‍यास सज्‍ज आहे. ही बाइक निश्चितच क्‍लास विनर म्‍हणून स्‍वत:चे विश्‍वसनीय स्‍थान अधिक दृढ करेल आणि राइडर्सना कधीच आव्‍हान देणे न थांबण्‍यास प्रेरित करेल.’’
एक्‍स-शोरूम किंमती पुढीलप्रमाणे आहेत
बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर  – आईएनआर – 20,25,000
बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर   प्रो   – आईएनआर – 22,15,000
बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर प्रो एम स्पोर्ट – आईएनआर – 24,45,000
* इन्‍वॉइसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू होईल. डिलिव्‍हरी एक्‍स-शोरूममधून होतील. एक्स-शोरूम किंमती (जीएसटी व कम्‍पेन्‍सेशन सेससह) लागू होतील परंतु त्यात रोड टॅक्‍स, आरटीओ स्‍टॅट्युअरी टॅक्‍स/फीज, इतर लोकल टॅक्‍स/सेस लेव्‍हीज आणि इन्‍शुरन्‍स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. प्राइसेस आणि ऑप्‍शन्‍स पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कृपया स्थानिक ऑथोराइज्‍ड  बीएमडब्ल्यू  मोटोर्राड डिलरशी संपर्क साधावा.
नवीन  आरआर   च्‍या डायनॅमिक डिझाइनला पूरक असे तीन आकर्षक रंग पर्याय आहेत – ब्‍लॅक स्‍टॉर्म मेटलिक, पॅशन आणि लाइट व्‍हाइट यूनी / एम   मोटोस्‍पोर्ट ( एम  पॅकेजसह).
राइडर्स दोन ऑप्‍शनल पॅकेजेस् – डायनॅमिक आणि  एम   सह बाइकला सानुकूल करू शकतात. डायनॅमिक पॅकेज डायनॅमिक डॅम्पिंग, कंट्रोल, राइडिंग मोड्स प्रो, हिटेड ग्रिप्‍स आणि क्रूझ कंट्रोलसह राइडिंग अनुभव वाढवू शकतात.  एम   पॅकेज (प्रो  एम   स्‍पोर्ट व्‍हेरिएण्‍टसाठी उपलब्‍ध) स्‍पेशल पेंटवर्क लाइट व्‍हाइट यूनी /  एम  मोटोस्‍पोर्ट,  एम   कार्बन व्‍हील्‍स,  एम   स्‍पोर्ट सीट,  एम   ब्रेक कॅलिपर्स ब्‍ल्‍यू, फ्यूएल फिलर कॅप ब्‍लॅक आणि  एम   राइडर फूटरेस्‍ट सिस्टिमसह रेसिंग वैशिष्‍ट्य वाढवते.