आयुष्याचा आनंद घ्या, प्रत्येक राइडसह होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे २०२३ CB200X लाँच; आता असिस्ट आणि स्लिपर क्लचसह

14

नवी दिल्ली, सप्टेंबर २०२३: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज ओबीडी२ चे पालन करणारी २०२३ CB200X लाँच केली. शहरी भाग तसेच आडवाटेवरून मार्ग काढण्यासाठी अतिशय विचारपूर्वक बनवण्यात आलेली CB200X नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करण्याची होंडाची क्षमता तसेच ग्राहकांच्या अपेक्षांच्या पलीकडे जात त्यांना प्रत्येक राइडसह आयुष्याचा नवा अनुभव देण्याचा ध्यास यांचे प्रतीक आहे. २०२३ होंडा CB200X ची किंमत रू. १,४६,९९९ (एक्स शोरूम दिल्ली) ठएवण्यात आली असून ती जवळच्या रेड विंग वितरकांकडे बुक करता येऊ शकेल.

CB200X च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालकअध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, होंडाच्या प्रख्यात सीबी मोटरसायकल्सच्या वारशापासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली CB200X लाँच करण्याचा हा क्षण ऐतिहासिक आहे. २०२१ मध्ये लाँच केल्यापासून CB200X ला बाजारपेठेत भरघोस प्रतिसाद मिळाला असून दैनंदिन प्रवास आणि शहराबाहेरच्या वीकेंड प्रवासासाठी ती ग्राहकांची उत्तम जोडीदार आहे.

एचएमएसआयचे हे नवे उत्पादन सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘ओबीडी२ नियमानुसार तयार करण्यात आलेले इंजिन, स्टालिश ग्राफिक्स आणि नवीन असिस्ट व स्लिपर क्लच बसवलेली २०२३ CB200X सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. १८०- २०० सीसी मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असलेली CB200X नव्या युगाच्या ग्राहकांची स्वप्ने आणि पॅशनने प्रेरित होऊन बनवण्यात आली आहे. प्रत्येक राइडसह आयुष्याचा नव्याने शोध घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी ही मोटरसायकल अगदी योग्य आहे.’

वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि दमदार कामगिरी

लेजंडरी CB500X एडीव्हीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली नवी CB200X ग्राहकांच्या रोजच्या प्रवासासाठी तसेच  वीकेंडच्या प्रवासासाठी अगदी योग्य आहे. दणकट बॉडीवर्क आणि नवीन ग्राफिक्स या गाडीचे वेगळेपण दर्शवताततर डायमंड टाइप स्टील फ्रेम वर्क दर्जेदार हाताळणी शक्य करते. CB200X मध्ये एलईडी लायटिंग सिस्टीम (एलईडी हेडलॅम्पएलईडी विंकर्स आणि एक्स शेप्ड एलईडी टेल लॅम्प) बसवण्यात आले आहे.

होंडाच्या अद्ययावत सब-२०० सीसी अर्बन एक्सप्लोररमध्ये सामर्थ्यवान १८४.४० सीसी४ स्ट्रोकसिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ नियमाचे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन बनवण्यात आले आहेजे आजा जास्त पर्यावरणपूरक करण्यात आले आहे. हे इंजिन ८५०० आरपीएमवर १२.७० केडब्ल्यू उर्जा निर्मितीतर ६००० आरपीएमवर १५.९ पीक टॉर्कची निर्मिती करते. CB200X चे कार्यक्षम आणि टॉर्की इंजिन रायडिंगचा दर्जेदार अनुभव देते.

दर्जेदार तंत्रज्ञान आणि सोयीस्करपणा

२०२३ होंडा CB200X ओबीडी२ मध्ये विविध सेन्सर्स वापरते आणि उत्सर्जनाच्या कामगिरीवर परिणाम करू शकणाऱ्या घटकांवर देखरेख करते. कोणत्याही प्रकारचा बिघाड आढळून आल्यास गाडीच्या इन्स्ट्रुमेंटल पॅनेलवर वॉर्निंग लाइट प्रकाशमान होतो. रायडरची सुरक्षितता उंचावण्यासाठी CB200X मध्ये ड्युएल पेटल डिस्क ब्रेक्स सिंगल चॅनेल एबीएससह बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लच बसवण्यात आला आहेजो सहजपणे गियर शिफ्टिंग करतो आणि डाउन शिफ्टिंग करताना रियर व्हील लॉकिंगला प्रतिबंध करते.

अपराइट रायडिंग पोझिशनसह CB200X मध्ये चांगली कामगिरी आणि रायडिंगचा आरामदायी अनुभव यांचा मिलाफ साधण्यात आला आहे. यात बसवण्यात आलेल्या आधुनिक व पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटल पॅनेलमध्ये ब्राइटनेस कमी- जास्त करण्याचे पाच स्तर देण्यात आले आहेत. त्यात स्पीडोमीटरओडोमीटर, टॅकोमीटरफ्युएल गॉजट्विन ट्रिप मीटर्सबॅटरी व्होल्टमीटरगियर पोझिशन इंडिकेटर आणि घड्याळ यांचा समावेश करण्यात आला आहे. CB200X चे गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागे असलेले मोनो- शॉक अबझॉर्बर यामुळे रायडिंग दर्जेदार होते.

खास मूल्य

२०२३ CB200X तीन स्टायलिश रंगांत उपलब्ध असेल – डिसेंट ब्लू मेटॅलिक (नवीन), पर्ल नाइटस्टार ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड यांचा समावेश आहे. त्याची किंमत रू. ,४६,९९९ (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. एचएमएसआयद्वारे १० वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्षांचे स्टँडर्ड आणि ७ वर्षांचे पर्यायी) देण्यात येणार आहे.

व्हेरिएंट CB200X OBD2
किंमत  (एक्स शोरूम दिल्ली) रू. ,४६,९९९
रंगांचे पर्याय डिसेंट ब्लू मेटॅलिक (नवीन), पर्ल नाइटस्टार ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड