आयस्‍कूलकनेक्‍ट चे पुण्यात स्‍टडी अब्रोड फेस्‍टचे आयोजन

109
iSchoolConnect organizes Study Abroad Fest in Pune

पुणे , ९ मार्च २०२३: आयस्‍कूलकनेक्‍ट ही परदेशात शिक्षण घेणाऱ्या इच्‍छुकांना साह्य करणारी आघाडीची एआय-सक्षम एडटेक कंपनी महाराष्‍ट्रात बहुप्रतिष्ठित २-दिवसीय स्‍टडी अब्रोड फेस्‍टचे आयोजन करत आहे. इव्‍हेण्टमध्‍ये ११ हून अधिक स्‍टडी-अब्रोड गंतव्‍यांमधील ३० हून अधिक प्रतिष्ठित जागतिक संस्‍थांतील प्रतिनिधी असतील, जे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांचे समुपदेशन करतील. फेस्‍टचे आयोजन पुण्‍यामध्‍ये १२ मार्च २०२३ रोजी हॉटेल नोवोटेल पुणे नगर रोड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्‍यात आले आहे.

iSchoolConnect organizes Study Abroad Fest in Pune

हा माहितीपूर्ण इव्‍हेण्‍ट महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांना सक्षम करेल, तसेच त्‍यांना अव्‍वल युनिव्‍हर्सिटीज, कोर्सेस व प्रोग्राम्‍समध्‍ये प्रवेशासाठी त्‍यांच्‍या चौकशींचे स्‍पष्‍ट निराकरण करेल. इव्‍हेण्‍ट्सदरम्‍यान विद्यार्थ्‍यांना १०० हून अधिक कोर्सेस व प्रोग्राम्‍सशी परिचित होण्याची आणि ऑन-द-स्पॉट ऑफर व शिफारसींच्या अमर्याद श्रेणीचा लाभ घेण्याची संधी मिळेल.

आयस्‍कूलकनेक्‍टचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष फर्नान्‍डो म्‍हणाले, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात संपन्न राज्य आहे आणि देशातील इतर उच्च जीडीपी राज्यांप्रमाणेच शैक्षणिक फायद्यांबाबत लक्षणीय जागरूकता आहे. रेडसीअरच्या अंदाजानुसार मूळ राज्‍यामधून परदेशात भारतीय उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीमध्‍ये ११ टक्‍के विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. इच्छुक विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमधील युनिव्‍हर्सिटी प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी देण्याचा संकल्प करत आम्ही या फेस्टचे आयोजन करत आहोत.

आशिष पुढे म्‍हणाले, अव्‍वल गंतव्‍यांमधून अनेक संस्थांची उपस्थिती बर्‍याच विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे आणि आम्हाला अनुक्रमे मुंबई व पुणे येथे १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोप, सिंगापूर आणि इतर देशांमधील युनिव्‍हर्सिटी प्रतिनिधींचे एक प्रमुख शिष्टमंडळ या इव्‍हेण्‍टमध्‍ये विद्यार्थ्यांना अमूल्य सल्ला देईल, त्यांच्या प्रवेशाच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करेल आणि अर्ज व प्रवेश प्रक्रियेची रूपरेषा तयार करेल.

याव्यतिरिक्त, सहभागींना कंपनीच्या परदेशातील इन-हाउस स्‍टडी अब्रोड सल्लागारांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यांना सरासरी १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे, आमचे चाचणी तयारी प्रशिक्षक, ज्यांनी प्रत्येकी किमान २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच कर्ज, प्रवास , निवास सहाय्य इत्‍यादींसाठी आमच्‍या सेवा भागीदारांशी देखील संवाद साधण्‍याची संधी मिळेल.