मुंबई : आयसीआयसीआय बँकेने आज रूपी व्होस्त्रो खाती उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली असून यामुळे भारतीय निर्यातदार आणि आयातदारांना भारतीय रूपयामध्ये (आयएनआर) आयात- निर्यात व्यवहारांचे पैसे भरून त्यांचा हिशोब पूर्ण करणे (सेटल) शक्य होणार आहे.
हा उपक्रम भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ तसेच आरबीआयच्या पावती, पेमेंट व रुपयाबरोबरच अमेरिकी डॉलर, युरो व इतर चलनांतील आयात- निर्यातीचा हिशोब पूर्ण करण्याच्या नियमावलीशी सुसंगत आहे.
बँकेतील अधिकृत वितरकांना व्यापारी भागीदार देशातील संबंधित बँकेत रूपी व्होस्त्रो खाते सुरू करून रुपयात व्यापारी व्यवहार करता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेकडे अमेरिका, कॅनडा, युएई, सौदी अरेबिया, इंग्लंड, जर्मनी आणि मलेशिया यां देशासह २९ देशांतील मिळून १०० रूपी व्होस्त्रो खाती आहेत.
या उपक्रमाविषयी आयसीआयसीआय बँकेच्या लार्ज क्लाएंट्स समूहाचे प्रमुख श्री. सुमीत संघाई म्हणाले, ‘भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रुपयातील परकीय व्यवहाराला चालना देण्याच्या धोरणाशी सुसंगत राहाण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने भारतीय आयातदार व निर्यातदारांना रूपी व्होस्त्रो खाती उपलब्ध करून दिली आहेत, ज्यांच्या मदतीने त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार रुपयात पूर्ण करणे शक्य होईल. आयसीआयसीआय बँकेकडे २९ देशांतील बँकांची मिळून १०० रूपी व्होस्त्रो खाती आहेत. या देशांमध्ये भारतातील बहुतेक निर्यात/आयात कॉरिडॉर्सचा समावेश असून भारतीय आयातदार व निर्यातदारांना सहजपणे रुपयात त्यांचा व्यापार व्यवहार पूर्ण करता येईल. यामुळे पर्यायाने भारताच्या जागतिक पातळीवरील व्यापाराला चालना मिळेल व भारतीय रुपयातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल. आयात- निर्यातीचा देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा आहे. या उपक्रमामुळे परकीय चलन विनिमयाची आयातदार व निर्यातदारांना सहन करावी लागत असलेली जोखीम कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्ण करण्यास वेग मिळेल असे आम्हाला वाटते.’
आयातदार व निर्यातदारांना आयसीआयसीआय बँकेच्या रूपी व्होस्त्रो खात्याचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स –
- रुपयामध्ये खरेदी पावती तयार करा – ट्रेड काउंटर पार्टीजना रुपयात खरेदी पावती स्वीकारण्यासाठी संपर्क करा.
- काउंटरपार्टीच्या बँकेत रूपी व्होस्त्रो खाते उपलब्ध आहे का याची तपासणी करा – काउंटर पार्टीच्या बँकेची नावे तपासा. आयसीआयसीआय बँकेचे खाते व्यवस्थापक किंवा कॉर्पोरेट इकोसिस्टीम शाखा अथवा ट्रेड डेस्कशी संपर्क साधून काउंटर पार्टीची बँक आयसीआयसीआय बँकेच्या व्होस्त्रो खात्यात आहे का याची खात्री करा.
- व्यवहाराचा हिशोब पूर्ण करा – आयसीआयसीआय बँकेमध्ये व्होस्त्रो खाते असेल, तर रुपयात व्यवहार पूर्ण करा आणि परदेशातील काउंटरपार्टीला पैसे पाठवा किंवा काउंटरपार्टीकडून पैसे स्वीकारा.
रूपी व्होस्त्रो खाते सुविधेशिवाय बँकेद्वारे निर्यात- आयात व्यवहाराच्या चक्राच्या प्रत्येक पातळीवर विविध प्रकारच्या डिजिटल सेवा पुरवल्या जातात. त्यामध्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रेड ऑनलाइन या आयात- निर्यातीसाठी बँकेने सुरू केलेला प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म, सीमेपलीकडचे व्यापार व्यवहार थेट ग्राहकाच्या ईआरपी सिस्टीमकडून सहजपणे हाताळणारे व पर्यायाने सोयीस्कर व्यवहार करणारे ट्रेड एपीआय, निर्यातीसाठी लागणाऱ्या रकमेचे तत्काळ वितरण करणारे क्रेडिट आणि एक्स्पोर्ट पॅकिंग (इन्स्टा ईपीसी) क्रेडिटच्या लेटर्ससाठी ईएलसी यांचा समावेश आहे.
त्याशिवाय बँकेच्या ट्रेड इमर्ज प्लॅटफॉर्मद्वारे विविध बँकिंग आणि त्यापलीकडच्या बँकिंग सेवा उदा. व्यवसाय स्थापनेपासूनचा संपूर्ण प्रवास, नियामक मार्गदर्शक तत्वे, भागिदाराचा शोध, लॉजिस्टिक्स, कार्गो ट्रॅकिंग अशा विश्वासार्ह भागिदारांकडून पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. बँकेतर्फे एक्सचेंज अर्नर्स फॉरिन करन्सी अकाउंटसारखे (ईईएफसी) व्यापार खाते, वन ग्लोबल ट्रेड अकाउंटसारखे (ओजीटीए) निर्यात- आयातीशी संबंधित व्यवहारांसाठीचे खाते इत्यादी सुविधाही पुरवल्या जातात.