आयसीआयसीआय बँकेतर्फे निर्यातदारांसाठी डिजिटल सुविधा लाँच

108

मुंबई, ४ जानेवारी २०२३ : आयसीआयसीआय बँकेने आज निर्यातदारांसाठी बँकिंग आणि मूल्यवर्धित सेवांची सर्वसमावेशक श्रेणी एकाच प्लॅटफॉर्मवर लाँच केली आहे. हा या क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून त्यामध्ये संपूर्ण निर्यात चक्रासाठी आवश्यक असणाऱ्या निर्यात बाजारपेठांचा शोध, निर्यात वित्त, निर्यातीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या सेवा ते परकीय चलन सेवा यांचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सध्या प्रदीर्घ वेळ घेत असलेल्या, मानवी हस्तक्षेपातून केल्या जाणाऱ्या प्रक्रिया सुलभ करून त्यांचे काम सोपे करणे व पर्यायाने त्यांची कार्यकारी क्षमता लक्षणीय प्रमाणात उंचावण्याचे ध्येय आहे.

 • एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वप्रकारच्या डिजिटल सेवा देणारी पहिली बँक
 • निर्यातदारांसाठी कार्यक्षम आणि सोयीस्कर सुविधांची श्रेणी
 • निर्यात व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी यामध्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट आणि ट्रेड एपीआय अशा सुविधांचा समावेश.

या सेवांमध्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेल्या एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट (इन्स्टा ईपीसी) आणि ट्रेड एपीआयचे त्वरित वितरण यासारख्या सेवांचाही समावेश आहे. इन्स्टा ईपीसीमुळे तत्काळ निर्यात वित्त पुरवले जाते, तर ट्रेड एपीआयमुळे निर्यात व्यवहार निर्यातदाराच्या थेट ईआरपी यंत्रणेतून सहजपणे हाताळले जातात व पर्यायाने अधिक सोयीस्करपणा मिळतो.

या उपक्रमाविषयी आयसीआयसीआय बँकेच्या लार्ज क्लायएंट्स समूहाचे प्रमख श्री. सुमीर सांघाई म्हणाले, इतक्या वर्षांत भारताने केलेल्या विकासात निर्यातीचा वाटा महत्त्वाचा आहे. आर्थिक वर्ष २०२२ मधील भारताची एकंदर निर्यात एका वर्षापूर्वीच्या ६७० अब्ज डॉलर्सवरून ३६ टक्क्यांनी वाढली आहे. २०३० पर्यंत ती २ ट्रिलियन डॉलर्सवर जाईल असा अंदाज आहे. आयसीआयसीआय बँकेने निर्यातदारांच्या विकासाला हातभार लावणारी डिजिटल सुविधांची श्रेणी उपलब्ध केली आहे. या सुविधांमुळे मोठ्या, मध्यम आणि उद्योन्मुख कंपन्यांना त्यांचे निर्यात व्यवहार ऑनलाइन पद्धतीने कुठेही आणि केव्हाही करणे शक्य होते. या उपक्रमामुळे संपूर्ण उद्योगांतील निर्यात चक्राची कार्यक्षमता वाढेल आणि व्यवसाय वाढीला चालना मिळेल.

निर्यातदारांसाठीच्या प्रमुख सेवा पुढीलप्रमाणे –

 • इन्स्टा ईपीसी – बँकेच्या सेवांचा लाभ घेत असलेल्या निर्यातदारांना तत्काळ व डिजिटल पद्धतीने एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिटचा (ईपीसी) लाभ मिळेल. ही सेवा ट्रेड ऑनलाइन या आयात- निर्यात व्यवहारांसाठी असलेल्या बँकेच्या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वापरता येईल. इन्स्टा ईपीसीमुळे केवळ काही मिनिटांतच कर्जाचे वितरण होते, तर एरवी याच गोष्टीसाठी या क्षेत्रात काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. या सुविधेमुळे निर्यातदारांना लक्षणीय फायदा मिळतो, कारण त्याद्वारे निधी मिळाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच त्याचा वापर करता येतो व पर्यायाने कार्यकारी क्षमता वाढते. 
 • ट्रेड अकाउंट्स – या सुविधेअंतर्गत फॉरिन करन्सी अकाउंट्स म्हणजेच एक्सचेंज अर्नर्स फॉरिन करन्सी अकाउंट (ईईएफसी) सुविधा उपलब्ध केली जाते. या करंट अकाउंटमध्ये निर्यातदारांना त्यांचे परकीय चलन स्थानिक चलनात रुपांतरित न करता ठेवता येते. या सुविधेमुळे निर्यातदारांना परकीय विनिमयाचा खर्च कमी करता येतो. त्याशिवाय या खास करंट अकाउंटद्वारे वन ग्लोब ट्रेड अकाउंटसारख्या (ओजीटीए) खात्याची सेवा पुरवून आयात व निर्यातीशी संबंधित व्यवहाराची सोय केली जाते.
 • कागदपत्रांशिवाय निर्यात सुविधा – बँकेच्या ई- सॉफ्टेक्स (आयटी/आयटीईएस निर्यातदार) आणि ई- डॉक्ससारख्या डिजिटल सेवांमुळे निर्यातदारांचा कागदपत्रांचे डिजिटल फायलिंग, सेटलमेंट, निर्यातीच्या पावत्या अशाप्रकारच्या सुविधांमुळे निर्यातदाराचा प्रवास सुलभ होतो. त्यामुळे सध्या या क्षेत्रात ज्या व्यवहारांसाठी काही दिवसांचा वेळ लागतो आहे, ते तत्काळ होतात व लक्षणीय प्रमाणात वेळ वाचतो. या सुलभ डिजिटल सेवांमुळे निर्यातदारांना अधिक वेगाने त्यांचे एक्सपोर्ट इन्सेटिव्हज मिळवता येतात.
 • परकीय विनिमय सुविधा – निर्यातदारांना फोनवर किंवा ऑनलाइन पातळीवरून फॉरेक्स व्यवहार बुक करून बुकिंग दरामध्ये लवचिकता आणि पारदर्शकता मिळवता येते.
 • डिजिटल लेटर ऑफ क्रेडिट फॅसिलिटी (ई- एलसी) – निर्यातदारांना ई- एलसी सुविधेचा लाभ घेता येईल जे डिजिटल रिपॉझिटरीसारखे काम करते तसेच व्यवहाराच्या अटींसाठी एलसी रियल टाइममध्ये उपलब्ध केले जाते.
 • इलेक्ट्रॉनिक बिल्स ऑफ लेडिंग (ई- बीएल) – बँकेने आघाडीच्या ई- बीएल सेवा पुरवठादारांशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत जगभरातील व्यवहारविषयक कागदपत्रांची संपूर्ण कार्यवाही हाताळली जाते. यामुळे एरवी या कामासाठी लागणारा ८- १० दिवसांचा वेळ काही दिवसांवर येतो आणि खेळत्या भांडवलाचे कार्यक्षम व्यवस्थापन होते.
 • मूल्यवर्धित सेवा – निर्यातदारांना ट्रेड इमर्ज या कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग व इतर सेवा पुरवणाऱ्या बँकेच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मूल्यवर्धित सेवांचा भाग घेता येईल. या प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायाची स्थापना, नियामक मार्गदर्शक तत्वे, भागिदाराचा शोध, लॉजिस्टिक व कार्गो ट्रॅकिंग अशा विश्वासार्ह भागिदारांतर्फे पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
 • ट्रेड एपीआय- बँकेद्वारे भविष्यवेधी, या उद्योगक्षेत्रातील पहिली, निर्यातीच्या बिलांची सुलभ हाताळणी करणारे ट्रेड एपीआय उपलब्ध करून दिले जाते. या एपीआयच्या श्रेणीमध्ये रेमिटन्सेस, लेटर्स ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी यांचा समावेश आहे. ट्रेड एपीआय सुविधेमुळे निर्यातदारांना कुठेही केव्हाही डु इट युवरसेल्फ अनुभव घेता येतो. एपीआयच्या मदतीमुळे निर्यातदारांना त्यांच्या ईआरपीद्वारे थेच बँकेसह व्यवहार करता येतात व उत्पादनक्षमता वाढवता येते.