आयसीआयसीआय प्रुडेन्शियनल लाइफ इन्श्युरन्सच्या गॅरंटीड बेनिफिट प्रोडक्ट्सच्या विक्रीत नोंदवली १५८ टक्के वृद्धी

21

वित्त वर्ष २०२० ते वित्त वर्ष २०२३ या काळात आयसीआयसीआय प्रुडेन्शियनल लाइफ इन्श्युरन्सच्या फायद्याची आणि बचतीची हमी देणाऱ्या उत्पादनांमध्ये १५८ टक्के वाढ झाली आहे. या दमदार वृद्धीतून हे दिसून येते की ग्राहकांना फायद्याची हमी असणाऱ्या उत्पादनांमध्ये रस आहे.

  • भांडवल सुरक्षित राहून लाभाची हमी देणाऱ्या कंपनीच्या
    उत्पादनांच्या विक्रीमध्ये झाली १५८ टक्के वाढ
  • ग्राहकांना फायद्याची हमी असणाऱ्या उत्पादनांमध्ये रस असल्याचे यातून दिसून येते

शेअर बाजारातील चढउतार वाढल्याने ग्राहक आता फायद्याची हमी देणाऱ्या उत्पानांना प्राधान्य देण्याकडे वळले आहेत. फायद्याची गॅरंटी असणाऱ्या योजना भांडवलही सुरक्षित ठेवतात आणि त्यातून परतावाही मिळतो. या श्रेणीतील योजना आर्थिक स्थैर्य देतात शिवाय यातून उत्पन्नाचा दुसरा स्रोतही निर्माण होण्याची शक्यता असते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियनल लाइफ इन्श्युरन्सचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री विनोद एच म्हणाले की, आम्हाला असे दिसून आले आहे की ग्राहक आता उत्पन्नाच्या वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत. आमचे ग्राहकोपयोगी उत्पादने जसे की आयसीआयसीआय प्रू गॅरंटीड इन्कम फॉर टुमारो, आयसीआयसीआय प्रू गोल्ड आणि आयसीआयसीआय प्रू सुख समृद्धी अशा योजनांमुळे ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टाबद्दल नियोजन करता येऊ लागले आहे. आमच्याकडील काही योजना ग्राहकांना पर्यायी उत्पनाचा पर्याय उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षानंतरच उत्पन्नाचा पर्याय मिळतो. काही योजनामध्ये बचतीचीही सुविधा देण्यात येते. त्यातून ग्राहकांना उत्पन्न मिळवता येऊ शकते किंवा त्यांना पुढील प्रीमियमसाठी ती रक्कम ठेवता येऊ शकते किंवा ती एकरकमीही घेता येऊ शकते. योजना संपण्याच्या कालावधीनंतरचा फायदा लक्षात घेता ग्राहकांनी दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्ट निश्चित करणे कधीही चांगले ठरते.

ग्राहकांच्या विविध श्रेणींसाठी अनेक प्रकारचे विमा उपलब्ध असल्याने कंपनीने ४डी फ्रेमवर्क तयार केले आहे. डेटा इनालिटिक्स, डायव्हर्सिफाईड प्रपोझिशन्स, डिजिटलाझेशन आणि भागीदारीतील डेप्थ यांचा समावेश आहे. डेटा अॅनालिटिक्समुळे नवीन अनोखी जीवन विमा योजना तयार करण्यास मदत होते. डायव्हर्सिफाईड प्रपोझिशन्समुळे कंपनीला आपल्या उत्पादनांची व्याप्ती वाढवून मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. डिजिटायझेशनमुळे ग्राहकांना पेपरलेस योजना घेता येतात तर त्यांना सेल्फ-सर्व्हिसचा पर्यायही खुला होतो. डिस्ट्रिब्युशनमधील डेप्थमुळे भागीदारी आणखी सक्षम होऊन ग्राहकांना उत्तम जीवम विमा मिळतो. ग्राहकांच्या गरजांनुसार त्यांना योग्य असलेलीच योजना देणे हा यामागचा उद्देश आहे.