आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्यूरन्स कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता `२.५ लाख कोटींच्या पार

79

मुंबई, ४ जानेवारी, २०२३ : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्यूरन्स कंपनीच्या व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेने (AUM) २.५ लाख कोटींच्या टप्पा ओलांडला आहे, जो ग्राहकांचा कंपनी वर असलेला विश्वास दर्शवितो. ग्राहक केंद्रित उत्पादने बाजारात आणणे, नवीन व्यवसाय प्रिमियम मध्ये वाढ,  उद्योग अग्रणी रेशो मध्ये सातत्य, उत्कृष्ट ग्राहक सेवा, उच्च जोखिम समायोजित परतावा (risk-adjusted returns) हे ग्राहकांना दिल्याचा हा परिणाम आहे. कंपनीने २२ वर्षांपूर्वी डिसेंबर २००० मध्ये कामकाज सुरू केले आणि आर्थिक वर्ष २००१ च्या अखेरीस तिची अंदाजे `१०० कोटी व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM) होती. कंपनीला `५०,००० कोटी एयूएम मिळविण्यासाठी ९ वर्षे लागली आणि एक लाख कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी १४ वर्षे लागली.

  • कंपनीवर पॉलिसीधारकांनी ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे
  • सुरुवातीपासूनच शून्य एनपीए चा ट्रॅक रेकॉर्ड
  • कंपनी ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करते.

तेव्हापासून, कंपनीला तिचे एयूएम दुप्पट करण्यासाठी म्हणजे `२ लाख कोटीं पर्यंत नेण्यासाठी  केवळ सहा वर्षे लागली आणि पुढील `५०,००० कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी दोन वर्षांपेक्षा थोडा कमी कालावधी लागला आणि ज्यामुळे ते `२.५ लाख कोटींवर गेले. कंपनी च्या एयूएम मध्ये १५०% ची वाढ नोंदवत एक लाख कोटींचा टप्पा ओलांडल्याने कंपनीच्या वाढीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्यूरन्स ३० सप्टेंबर २०२२ रोजी पर्यंत न्यू बिझनेस सम अॅश्यूर्ड च्या संदर्भात १५.७% च्या मार्केट शेअर सह खासगी बाजारपेठेत अग्रणी आहे.

कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी जीवन विमा समाजात महत्वाची भूमिका बजावते. आज कंपनी त्याच्या व्यवसायात ज्या पद्धतीने पुढे जात आहे त्यासाठी लोकांच्या जीवनात आणि उपजीविकेत बदल घडवून आणण्याच्या कंपनीच्या व्यापक  उद्दिष्टाने कंपनीला प्रोत्साहित केले आहे. एक मोठी आणि जबाबदार जीवन विमा कंपनी म्हणून तिने तिच्या कार्यामध्ये पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) घटक देखील एकत्रित केले आहेत.

आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्यूरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री मनीष कुमार म्हणाले, विशेषतः २२ व्या वर्षातच हा महत्वाचा टप्पा गाठल्याने आम्ही आनंदित आहोत. आम्ही मानतो की, जीवन विमा कंपनी साठी व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM एयूएम) ही ग्राहकांनी कंपनीवर ठेवलेल्या विश्वासाचे गुणात्मक प्रतीक आहे कारण जीवन विमा हे दीर्घकालीन उत्पादन आहे.

आमची गुंतवणूक तत्वे अत्यंत कठोर व शिस्तीची आहेत कारण ग्राहक त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी कष्टाने कमावलेली बचत आमच्याकडे विश्वासाने सोपवतात. आमच्या या दृष्टिकोनामुळे आणि शिस्तबद्ध कठोर तत्वांमुळे सुरुवातीपासूनच आणि सर्व मार्केट सायकलस् मध्ये शून्य एनपीए मिळविले आहे. आमच्या व्यवसायात इएसजी घटकांचा समावेश  करणे हे आमच्या महत्त्वाच्या व केंद्रस्थानी असलेल्या उद्दिष्ट क्षेत्रांपैकी एक आहे. इएसजी समस्यांबाबत आमची बांधिलकी आमच्या कामातून प्रतीत होत असल्यामुळे आम्ही जबाबदार गुंतवणुकीसाठी संयुक्त राष्ट्र समर्थित तत्वांवर स्वाक्षरी करणारी पहिली भारतीय विमा कंपनी झालो आहोत. इएसजी केंद्रित ‘सस्टेनेबल इक्विटी फंड’ बाजारात आणणारी पहिली जीवन विमा कंपनी देखील आम्हीच होतो. ग्राहकांच्या संवेदनशीलतेचे संरक्षण आणि दीर्घकालीन बचत गरजा पूर्ण करणारी चिरस्थायी संस्था निर्माण करणे या आमच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन घेऊन आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा देणारी उत्पादने आणि सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्नशील असतो.

कंपनी ने वेगवेगळे आधुनिक डिजिटल सोल्यूशन्स ग्राहकांसाठी आणले आहेत ज्यांच्यामुळे ग्राहकांना माहिती उपलब्ध होईल, ते त्यांच्या पॉलिसी संबंधित व्यवहार घरच्या घरी बसून आरामात करू शकतील. या व्यतिरिक्त अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने, वितरणाची बहू मार्गी रचना (multi-channel distribution architecture) आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा या मुळे कंपनी ग्राहकांच्या आवडीची  जीवन विमा भागीदार बनली आहे.