आयडीबीआय बँके तर्फे एनईएसएल च्या सहकार्याने ई बँक गॅरेंटी (ई-बीजी) सेवेची सुरुवात

60

आयडीबीआय बँके तर्फे ई-बँक गॅरेंटी (ई-बीजी) सुविधेची सुरुवात नॅशनल ई कॉमर्स सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल) बरोबर भागीदारी करुन केल्याची घोषणा करण्यात आली.  यामुळे आता कागदपत्रांवर आधारीत बीजी जारी करण्याच्या प्रक्रिया बंद होऊन आता ही प्रक्रिया ई-स्टॅम्पिंग आणि ई-सिग्नेचर्स ने युक्त होणार आहे. 

यामुळे बँकेने आता आपल्या ग्राहकांना डिजिटल आणि ग्राहककेंद्री सुविधा प्राप्त करुन देण्याच्या योजनेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.  या प्रक्रियेमुळे बँके मध्ये आता पारदर्शकता वाढून प्रक्रियेचा कालावधी आता दिवसांवरुन काही तासांवर येणार आहे.  ई- बीजी ची प्रक्रिया ही ई-स्टॅम्पिंग आणि ई-सिग्नेचर्स ने सुरु होऊन त्यांना ही बँक गॅरेंटी आता लाभार्थींना अगदी काही मिनिटात उपलब्ध होणार आहे.  सुरक्षित प्रसारण आणि अधिक पारदर्शकतेमुळे  लाभधारकांचे कष्ट आणि कागदोपत्री बीजीज च्या तपासणीचा वेळ खूपच कमी होणार आहे.

या सेवांविषयी बोलतांना आयडीबीआय बँकेचे एमडी आणि सीईओ श्री राकेश शर्मा यांनी सांगितले “ आमच्या ग्राहकांना डिजिटल ऑफरिंग्जच्या माध्यमातून सुरक्षित आणि वेगवान बँकिंग सेवा देणे ही गोष्ट बँकेच्या ‍डिजिटल उपक्रमांना चालना देण्यामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे. 

ई-बीजी सुविधेसाठी एनईएसएल बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत असून यामुळे ई-स्टॅम्पिंग आणि ई-सिग्नेचर मुळे बीजीची प्रक्रिया सोपी होईल.  हे पाऊल म्हणजे अर्जदार आणि लाभार्थी दोघांना व्यवसाय करण्यासाठी खूपच सुलभ प्रक्रिया करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” 

एनईएसएल चे एमडी आणि सीईओ श्री देबज्योती राय चौधरी यांनी सांगितले “ एनईएसएल ची ई बीजी सुविधा ही पेपरलेस असून ती डिजिटल पध्दतीने लाभधारकांसाठी ई-बीजी नोंदणीसाठी एनईएसएल च्या पोर्टलवर उपलब्ध आहे.  वापरकर्त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया ही एकाच वेळेस आणि सोप्या पध्दतीने करायची आहे. 

ई-बीजीज मोठ्या प्रमाणावर काढण्यासाठी एनईएसएल कडून एपीआयच्या माध्यमातून एकात्मिक ईआरपी ची सुविधा ही देण्यात येते.  हे उत्पादन सुरु करण्यासाठी आमच्या टिम बरोबर सातत्याने आणि अथक परिश्रम घेऊन काम केल्याबद्दल मी आयडीबीआय बँकेच्या चमूचे अभिनंदन करतो.”