पुणे २७ जानेवारी २०२३: आयटीआय म्युच्यूअल फंडाने आयटीआय फ्लेक्झी फंडच्या रुपाने नवीन फंडाची (एनएफओ) घोषणा केली आहे. हा फंड आज खुला होत असून येत्या १० फेब्रवारी २०२३ ला बंद होणार आहे. या फंडासाठी किमान गुंतवणूक पाच हजार रुपये असून त्यानंतर एक रुपयाच्या पटीत निधी गुंतविता येईल. या फंडाचे व्यवस्थापन धिमत शहा आणि रोहन कोरडे हे संयुक्तरित्या सांभाळणार आहे. निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्स या निर्देशांकावर हा फंड आधारित राहणार आहे.
आयटीआय म्युच्यूअल फंड वैशिष्ट्येः
- आयटीआय फ्लेक्झी कॅप फंड प्रामुख्याने मुदतमुक्त इक्विटी फंड
- दीर्घ मुदतीत भांडवलाची वृध्दी हवी असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम गुंतवणूक फंड
- मोठ्या, मध्यम आणि छोट्या प्रकारातील कंपन्यांत आयटीआयचा हा नवीन फंड गुंतवणूक करणार
बड्या, मध्यम आणि छोट्या अशा विविध भांडवली क्षमतेच्या कपन्यांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड प्रामुख्याने तयार करण्यात आलेला आहे.
एनएफओच्या शुभारंभप्रसंगी बोलताना आयटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया म्हणाले की, विविध क्षेत्रात आणि विविध क्षमतेच्या भांडवली कंपन्यामध्ये सतत गुंतवणूकशील राहण्याने मिळणारे फायदे गुंतवणूकदारांच्या पदरात टाकण्यासाठी आम्ही हा फ्लेक्झी कॅप फंड बाजारात आणला आहे. भविष्यात भांडवली प्रवाह वाढत जाणार असल्याने विविध उद्योगांच्या वाढीच्या वक्रावर वाटचाल करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. आमच्या फंड कंपनीची दैदिप्यमान कामगिरी आणि गुंतवणूकीची उत्तम पध्दती याच्या जोरावर विविध जोखीमेची क्षमता असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचे पर्याय सादर करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयटीआय म्युच्यूअल फंडाने एप्रिल २०१९ मध्ये आपले कामकाज सुरु केले आणि गुंतवणूकदारांसाठी आत्तापर्यंत मुख्य प्रवाहातील १६ फंड बाजारात आणलेले आहे. वित्तीय व्यवस्थापन सांभाळणाऱ्या या कंपनीला( एएमसी) भरगच्च गंगाजळी असणाऱ्या पारंपारिक उद्योगसमूहाचे पाठबळ लाभलेले आहे. अत्यंत कमी कालावधीत या एएमसीने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूकीचा सहजसुखद अनुभव प्रदान केलेला आहे. हा फंड ३१ डिसेंबर २०२२ अखेरीस तीन हजार ५५७ कोटी रुपयांचे व्यवस्थापन सांभाळत आहे. एकूण निधीपैकी समभागात दोन हजार ६७४ कोटी ९४ लाख, हायब्रीड व डेट फंडात अनुक्रमे ५५३ कोटी ४५ लाख आणि ३२९ कोटी ३४ लाख रुपये अशी वर्गवारी आहे. भौगोलिक विभागणीचा विचार केला तर देशातील प्रमुख पाच शहरांचा निधीत एकूण हिस्सा ४०.५३ टक्के आहे. त्यापुढील दहा शहरांचा १९.७७ टक्के, पुढील २० शहरांचा १२.२७ टक्के, त्यापुढील ७५ शहरांचा हिस्सा १०.५० टक्के आणि अन्य छोट्या शहरांचा हिस्सा १६.९२ टक्के आहे.
चार वर्षापेक्षा कमी कालावधीत आयटीआय म्युच्यूअल फंडाने १६ योजना आणल्या असून म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यास वचनबध्द आहे.
आयटीआय म्युच्यूअल फंडाचे देशात ५७ ठिकाणी (शाखा आणि समुह कार्यालयाच्या माध्यमातून) कार्यालये असून तब्बल १९ हजार ६९८ वितरकांचे जाळे फंडाने उभे केलेले आहे.
हेही वाचा :