आयओटेकवर्ल्ड ने पुण्यात नवीन सेवा केंद्र सुरू केले

38
IoTechWorld

पुणे, : भारतातील अग्रणी कृषी-ड्रोन उत्पादक असलेल्या आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन प्रा. लिमिटेडने वर्ष २0२३- २४ मध्ये ३000 पेक्षा अधिक ड्रोन्सची विक्री करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असून गेल्या आर्थिक वर्षातील ५00 या विक्रीच्या तुलनेत ही ६ पट वाढ आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी आयओटेकवर्ल्ड नवीन भागांमध्ये उपस्थिती वाढविण्याची योजना असून आयओटेकवर्ल्ड सेवा केंद्र नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी समांतरपणे काम करत आहे. आयओटेक ही सध्या महाराष्ट्र आणि ८ राज्यांमध्ये कार्यरत आहे. आयओटेकवर्ल्ड ने अलीकडेच पुण्यात कृषी-ड्रोनसाठी नवीन सेवा केंद्र उघडले आहे. अधिक सेवा केंद्रे असल्यामुळे ग्राहकांच्या गरजांना जलद प्रतिसाद देऊ शकते आणि दुरुस्ती किंवा देखभालीसाठी लागणारा वेळ कमी करू शकते.

कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक श्री. दीपक भारद्वाज आणि श्री. अनूप उपाध्याय म्हणाले “आम्ही यावर्षी ६ पट वाढीची अपेक्षा करत आहोत. विविध भागधारकांकडून कृषी-ड्रोनला मिळणारी चालना आणि प्रतिसाद लक्षात घेतला तर ती सहज साध्य होईल, असा आम्हाला विश्वास आहे. खरं तर, कृषी तंत्रज्ञानाच्या या क्षेत्राचा उपयोग करण्यामध्ये अनेक लोकांनी स्वारस्य दाखविले आहे. आम्ही त्यांच्या प्रोफाईलचे मूल्यमापन करत आहोत”

श्री. अनूप उपाध्याय म्हणाले, “आमच्या कृषी ड्रोनला शेतकरी आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून आणि संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि चालू आर्थिक वर्षात आमचे लक्ष्य असलेली वाढ नोंदवण्याचा आम्हाला अत्यंत आत्मविश्वास आहे. आमच्या योजनांबद्दल आम्ही उत्साहित आहोत आणि त्यांच्यामुळे भारतातील कृषी-ड्रोनच्या बाजारपेठेत आयओटेकवर्ल्ड चे स्थान बळकट होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.”

श्री. दीपक भारद्वाज म्हणाले की आयओटेकवर्ल्ड च्या कृषी-ड्रोन्सची किंमत अगोदर स्पर्धात्मक आहे. कृषी-ड्रोन्समध्ये ७0 टक्क्यांहून अधिक स्थानिक सुटे भागांचा वाढलेला वापर आणि विक्रीतील वाढ यांमुळे हे दर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. नॅनो खत भारतात लागू करण्यात आयओटेकवर्ल्ड मोठी भूमिका बजावू इच्छिते कारण नॅनो खत आणि कृषी-ड्रोन्स यांच्या मिलाफामुळे वेळ, खर्च, मातीची गुणवत्ता यांत बचत होईल आणि शेतकऱ्यांना चांगले परिणाम आणि उत्पन्न मिळेल.

सध्या कंपनी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसाठी अनेक विद्यापीठे आणि इतर संस्थांसोबत सहकार्य करत आहे. प्रत्येक ठिकाणी दरवर्षी ३६0 नवोदित ड्रोन पायलटना प्रशिक्षण देण्याची आरपीटीओची क्षमता असून कंपनीने आजपर्यंत ४00 पेक्षा अधिक पायलटना प्रशिक्षित करण्यात मदत केली आहे.

अॅग्रीबॉट हा डीजीसीए टाईप सर्टिफिकेट मिळविणारा भारतातील पहिला ड्रोन आहे. गेल्या महिन्यात कंपनीने नवीन प्रकारचे कृषी-ड्रोन लॉन्च करून अनेक व्यासपीठांवर नवीन मॉडेलचे प्रदर्शन केले आहे.